Naate Navyane : अजिंक्य राऊत-शिवानी बावकरची जमली जोडी! ‘नाते नव्याने’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला
Naate Navyane : ‘नाते नव्याने’ या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून, तो अत्यंत देखणा झाला आहे.
Naate Navyane : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे...’ या मुखडयाचे प्रेमगीत प्रदर्शित केले असून, एव्हरेस्ट म्युझिकच्या युट्युबवर या व्हिडीओला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या गाण्यात टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कलाकार अजिंक्य राऊत (Ajinkya Raut)-शिवानी बावकरची (Shivani Baokar) जोडी जमली आहे.
‘नाते नव्याने’ या गाण्याचे टीझर आणि ट्रेलर बुधवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. या टीझर आणि ट्रेलरमध्ये या गाण्याची एकूण पार्श्वभूमी समोर येते. हे गाणे एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ही प्रेमकथा आहे मायरा आणि जय यांच्यातील. काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशी गोंधळाच्या परिस्थितीतील ही प्रेमकथा आहे. यातील प्रेमाच्या भावना या नितळ आहेत, पण नायक मात्र नायिकेसमोर त्या मांडायला कचरतो आहे. या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे मग गाण्याच्या मुख्य व्हिडीओबद्दलची उत्सुकता अधिक ताणली जाते.
‘नाते नव्याने’ या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला असून, तो अत्यंत देखणा झाला आहे. या गाण्याच्या लाँचला अजिंक्य राऊत, शिवानी बावकर आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.
एव्हरेस्ट म्युझिक हे एक अत्यंत लोकप्रिय असे युट्युब चॅनेल असून त्यावर 450हूनही अधिक गाणी आहेत आणि त्यांना आत्तापर्यंत कोटींमध्ये प्रेक्षकसंख्या लाभली आहे. त्यामध्ये स्वतंत्र गाणी, भक्तीपर गीते, प्रेमगीते, उत्सवाची गाणी, नृत्ये, प्रेरणागीतांचा समावेश असूनही गाणी चित्रपट आणि स्वतंत्र अल्बममधील आहेत. त्याशिवाय या गाण्यांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषांमधील मुलांसाठीच्या गाण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ही गाणी घराघरात लोकप्रिय झाली आहेत. त्याशिवाय यातील गाणी ही विविध प्रकारांमध्येही विभागली गेली आहेत. म्हणजे गणपती बाप्पा, अंबे दुर्गे, विठ्ठल या देवतांची वेगळी भक्तिगीते या चॅनेलवर आहेत, तर शिवाजी महाराजांवरील प्रेरणागीते तसेच चित्रपटगीतांचाही त्यात समावेश आहे.
हेही वाचा :