Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : नवी ‘दया बेन’ सापडली! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली दया भाभीच्या भूमिकेसाठी विचारणा
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : लवकरच या मालिकेत दया भाभी परत येणार आहे. या बातमीमुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. कधी या मालिकेतील कथानक, तर कधी कलाकार सतत काहीना काही कारणामुळे ही मालिका प्रसिद्धी असते. अनेक कलाकार सध्या या मालिकेला रामराम ठोकण्याच्या विचारात आहेत. काहींनी ही मालिका सोडल्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र, यातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे ‘दया भाभी’. गेल्या चार वर्षांपासून ही व्यक्तिरेखा मालिकेत दिसत नसल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.
लवकरच या मालिकेत दया भाभी परत येणार आहे. या बातमीमुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दयाबेन बनून सर्वांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकाणीने काही वर्षांपूर्वी या शोला निरोप दिला होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत प्रेक्षक तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. यादरम्यान अनेक अभिनेत्रींची नावेही समोर आली. पण, दयाबेन या मालिकेत परतलीच नाही.
दयाबेन परतणार!
पण, आता प्रेक्षकांची सर्वात आवडती व्यक्तिरेखा 'दयाबेन' चार वर्षांनंतर या शोमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी मेकर्स अनेक अभिनेत्रींची ऑडिशन घेत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी एक नवीन नाव पुढे येत आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरल्या तर, लवकरच ‘ही’ अभिनेत्री ‘दया बेन’ साकारताना दिसू शकते.
90च्या दशकातील हिट मालिका 'हम पांच' मधील पात्र ‘स्वीटी माथूर’ साकारून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री राखी विजान हिला ‘दयाबेन’च्या भूमिकेसाठी निवडण्यात आल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. निर्माते असित कुमार मोदी यांनी अलीकडेच मीडियाला या संदर्भात माहिती देताना सांगितले की, प्रसिद्ध पात्र ‘दया भाभी’ लवकरच कथेत परत येणार आहे. परंतु 'दयाबेन' ची भूमिका करणारी दिशा वाकाणी परतणार नाही. तिच्या ऐवजी दुसरी अभिनेत्री यात दिसेल. दरम्यान, आता एका सूत्राने सांगितले की, 'दयाबेनची भूमिका करण्यासाठी राखी विजानला संपर्क करण्यात आला आहे. राखी ही सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा कॉमिक टायमिंग चांगला आहे. म्हणूनच या भूमिकेसाठी तिचा विचार करण्यात येत आहे.’
दिशा वाकाणी परतणार नाही!
अभिनेत्री दिशा वाकाणी 2017मध्ये प्रसूती रजेवर गेली होती. मात्र, त्यानंतर ती शोमध्ये परतलीच नाही. शोच्या निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे आता दिशाऐवजी ‘दया बेन’च्या अवतारात कोणती अभिनेत्री येणार आणि चाहत्यांकडून तिला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा :