Sarsenapati Hambirrao : खंबीर तू रणवीर तू... हिंदी सिनेमांना 'सरसेनापती हंबीरराव'ने दिली टक्कर; तिसऱ्या आठवड्यात घोडदौड सुरू
Sarsenapati Hambirrao : 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.
Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंच्या (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा अनेक बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत आहे. रसिक प्रेक्षकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यातदेखील यशस्वी घोडदौड केली आहे.
सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
मुंबई, ठाणे, पुणे, मराठवाडा, विदर्भ, सांगली, नाशिक, कोल्हापूरमध्ये सिनेमागृहात हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमात गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर प्रविण तरडे स्वतः ‘सरसेनापती हंबीररावां’ची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे.
अनेक कलाकारदेखील हा चित्रपट आवर्जून बघत असून, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 11 दिवसांत या सिनेमाने 18.20 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. त्यामुळे आता सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक सहकुटुंब सहपरिवार हा सिनेमा पाहत आहेत. ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती. 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' असे डायलॉग या सिनेमात आहेत.
‘बाहुबली’नेही केलेय कौतुक!
या चित्रपटाच्या टीझरला ‘बाहुबली’कडून कौतुकाची थाप मिळाली होती. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाच्या टीझरचे जाहीर कौतुक केले होते. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित सिनेमाचे कौतुक केले होते. ‘बाहुबली’ला देखील या सिनेमाची उत्सुकता होती.
संबंधित बातम्या