एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 16 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 16 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

‘हॅरी पॉटर’च्या जादुई विश्वातील तारा निखळला! ‘हॅग्रिड’ फेम अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे निधन

हॉलिवूड चित्रपट सीरिज 'हॅरी पॉटर'मध्ये (Harry Potter) हॅग्रिडची (Hagrid) भूमिका साकारणारे प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रन (Robbie Coltrane) यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'हॅरी पॉटर' व्यतिरिक्त, ते ITV चा सस्पेन्स शो 'क्रॅकर' आणि जेम्स बाँड चित्रपट 'गोल्डनी' आणि 'द वर्ल्ड इज नॉट इनफ' मध्ये देखील झळकले होते.

‘कांतारा’चा IMDbवर धुमाकूळ! धनुष अन् प्रभासने कौतुक केलेल्या चित्रपटाची आयएमडीबी रेटिंग पाहिलीत का?

दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' (Kantara) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या अवघ्या चित्रपटाने 14 दिवसांत एकूण बजेट वसूल करत नफा कमावला आहे. बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कन्नड भाषेत 72.81 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जन देखील थिएटरमध्ये रिलीज झाले आहे. तर, IMDbवरही चित्रपटाने चांगले रेटिंग मिळवले आहे. कन्नड भाषेतील चित्रपट ‘कांतारा’ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. आता हा चित्रपट IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने IMDb वर 9.5 रेटिंग मिळवून विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘KGF 2’च्या नावावर होता.

अखेर मुहूर्त सापडला! सलमान-कतरिनाचा ‘टायगर 3’ची रिलीज डेट जाहीर 

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफची (Katrina Kaif) जोडी चाहत्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या दोघांच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल अर्थात ‘टायगर 3’ (Tiger 3) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाची एक झलक आणि रिलीज डेट आधीच जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून, नवी तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘टायगर 3’ हा चित्रपट आता पुढच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

बाळाला स्तनपान करता करता सोनमनं केली करवा चौथची तयारी; हृदयस्पर्शी व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सोनमच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच तीचं चाहत्यांकडून कौतुक होत असतं. नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या बाळाबरोबर पालकत्वाचा आनंद घेतेय. मात्र, सोनम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, नुकत्याच आई झालेल्या सोनम कपूरने लग्नाच्या चार वर्षानंतर करवा चौथच्या व्रताबद्दल खुलासा केला आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

'हर हर महादेव' चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला 'हर हर महादेव' हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहेत. नुकतंच या चित्रपटातील 'बाजी रं बाजी रं' गाणं प्रदर्शित झालं आहे.

13:53 PM (IST)  •  16 Oct 2022

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या मंचावर सिद्धार्थ-कियाराच्या नात्याचा उलगडा

Sidharth Malhotra In Bigg Boss 16 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमातील वीकेंडचा वार खूप खास असतो. यादिवशी भाईजान कधी स्पर्धकांची शाळा घेतो तर कधी सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावत असतात. नुकत्याच पार पडलेल्या भागात सलमानने सिद्धार्थ आणि कियारा आडवाणीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. 

13:08 PM (IST)  •  16 Oct 2022

Films Release On Diwali : दिवाळीत प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

Films Release On Diwali : देशभरात 24 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीसाठीदेखील दिवाळीचा सण खूप खास आहे. दरवर्षी दिवाळीला फक्त एक किंवा दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण आता सात सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात हिंदीसह दाक्षिणात्य सिनेमांचादेखील सहभाग आहे. 

13:03 PM (IST)  •  16 Oct 2022

अक्षय कुमार नव्हे कार्तिक आर्यनला ऑफर झाली होती पानमसाल्याची जाहिरात! अभिनेत्याने धुडकावले तब्बल 15 कोटी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार एका गुटखा कंपनीच्या जाहिरातीत दिसला होता, तेव्हा त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. या पान मसाला जाहिरातीत तो बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत झळकला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जाहिरातीत अक्षयच्या जागी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार होता. मात्र, त्याने ही ऑफर धुडकावून लावली. या पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी कार्तिक आर्यनला तब्बल 15 कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आली होती.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

12:06 PM (IST)  •  16 Oct 2022

Manava Naik : "रुक तेरेको देखता हूँ..."; मनवा नाईकने शेअर केला उबर चालकाचा धक्कादायक प्रसंग

Manava Naik : मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकला (Manava Naik) नुकताच एका धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगावर भाष्य केलं आहे. पोस्ट शेअर करत तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटोदेखील शेअर केला आहे. 

11:45 AM (IST)  •  16 Oct 2022

आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ मिळतेय चाहत्यांची पसंती! बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'डॉक्टर जी' (Doctor G) हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आयुष्मानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3.65 कोटींचे नेट कलेक्शन केले होते. पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अंदाजे 5.25 कोटी (Doctor G Collection)  रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या नेट कलेक्शनमध्ये जवळपास 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRatan Tata Dog Love Special Report : रतन टाटांनी आयुष्यभर जपली भूतदयाRatan Tata Special Report : उद्यमशील तरूणांचा आधारवड हरपलाABP Majha Headlines : 7 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Embed widget