TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata Death) यांचे बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रतन टाटांना देश आणि जगभरातून अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले, ज्यात भारताचा दुसरा सर्वात मोठा नागरी सन्मान पद्म विभूषण यांचा समावेश आहे. रतन टाटांना केवळ एक उद्योगपती म्हणूनच ओळखले गेले नाही, तर एक व्यक्ती म्हणून देखील ओळखले गेले, जे त्यांचे मानवी गुण, श्वानांवरील प्रेम आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होते. टाटा यांनी आपल्या आयुष्यातील कर्मांना नेहमीच अधिक महत्त्व दिले. त्यांनी 165 कोटी रुपये खर्च करत नवी मुंबईत 5 -स्टोरी डॉग हॉस्पिटल सुरू केले. रतन टाटा यांचे भारताच्या औद्योगिक विकासात प्रचंड योगदान 1991 ते 2012 या काळात रतन टाटा टाटा सन्सचे अध्यक्ष होते. यानंतर, 2 डिसेंबर 2012 पासून त्यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे अध्यक्ष इमेरिटस (सन्मानित अध्यक्ष) ही पदवी देण्यात आली. त्यांना ब्रिटीश साम्राज्याच्या सर्वात उत्कृष्ट ऑर्डर ऑफ द नाईट ग्रँड क्रॉसनेही सन्मानित करण्यात आले, तर रॉकफेलर फाउंडेशनने त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले. याव्यतिरिक्त, त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी आणि शैक्षणिक संस्थांकडून मानद पदके देखील देण्यात आली. त्यांच्या मृत्यूची पुष्टी करताना टाटा सन्स चेअरमन एन चंद्रशेकरन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्हाला अत्यंत दु:ख वाटते की आम्ही रतन टाटा या एका महान नेत्याला निरोप देत आहोत, ज्यांचे प्रचंड योगदान केवळ टाटा समुहालाच नाही तर आपल्या देशासाठी उपयोगी ठरले आहे. "