एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 15 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 15 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Kon Honar Crorepati : डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने आणि प्रसिद्ध लेखक, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी सहभागी होणार आहेत.

 Takatak 2 : 'टकाटक'चा येणार सिक्वेल; मोशन पोस्टर रिलीज

बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'टकाटक' (Takatak) या मराठी सिनेमाचा सिक्वेल असलेल्या 'टकाटक 2'ची (Takatak 2) रसिक खूप आतुरतेनं वाट पहात आहेत. 18 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक 2'चं मोशन पोस्टर आता रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आलेल्या 'टकाटक 2'च्या मोशन पोस्टरमध्ये कलाकारांची धमाल पहायला मिळत आहे.लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेलं अनोखं मोशन पोस्टर रसिकांसोबतच संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच 'टकाटक 2'च्या मोशन पोस्टरनं लक्षवेधी लाईक्स मिळवले असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या भागात आमिर खान होणार सहभागी; हॉट सीटवर बसून देणार उत्तर

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या ज्ञानातदेखील भर घातलो. त्यामुळेच या कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता असते. 'कौन बनेगा करोडपती 14' या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात आमिर खान (Aamir Khan) सहभागी होणार आहे. तसेच हॉट सीटवरबसून प्रश्नांचे  उत्तर देताना दिसणार आहे.

ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी(Lalit Modi) यांच्या प्रेमाचा अध्याय सुरु झाला आहे.  ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत काही फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे.  ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय. तसेच सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf  असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Ananya : 'होऊ दे चर्चा' रविवारी रंगणार 'अनन्या' स्पेशल भाग; हास्यवीरांचे विनोद कार्यक्रमाला हास्याचे रंग चढवणार

प्रेक्षकांना येत्या रविवारी एक खास कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशल' (Hou De Charcha Ananya Special) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. 'अनन्या' सिनेमाचा संपूर्ण चमू या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. दरम्यान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. 'अनन्या' या सिनेमाची पहिल्या पोस्टरपासून चर्चा आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच 'होऊ दे चर्चा - अनन्या स्पेशल' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि लेखन आपल्या खुमासदार शैलीत समीर चौघुले यांनी केले असून वनिता खरात, प्रभाकर मोरे, शिवाली परब, गौरव मोरे, चेतना भट, ओंकार भोजने हे कलाकार गावकऱ्यांच्या भूमिकेत धमाल उडवणार आहेत.

16:34 PM (IST)  •  15 Jul 2022

'सेम टू सेम'; दीपिकासारख्या दिसणाऱ्या तरुणीची सोशल मीडियावर हवा!

Deepika Padukone : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. आता या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone) नावाचा समावेश झाला आहे. दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंना पाहून नेटकरी देखील अवाक् झाले आहेत. 

वाचा सविस्तर बातमी 

15:45 PM (IST)  •  15 Jul 2022

'शालू' कुणाकडे पाहून एवढं गोड हसतेय? कोण आहे तो? उत्तर मिळालं...

Rajeshwari Kharat : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. राजेश्वरी वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. राजश्वरीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती एक तरुणाकडे पाहून हसताना दिसत आहे. राजेश्वरीनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकरी फोटोमध्ये तिच्यासोबत असलेल्या तरुणाबाबत प्रश्न विचारत होते. एका नेटकऱ्यानं विचारलं, 'तो जब्या आहे का?' तर दुसरा म्हणाला, 'कोण आहे तो?' आता नेटकऱ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 

14:55 PM (IST)  •  15 Jul 2022

Koffee With Karan 7: रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडाच्या नात्याबाबत सारा अली खानचा गौप्यस्फोट; म्हणाली...

Koffee With Karan 7: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की, रश्मिका ही प्रसिद्ध अभिनेता  विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे. रश्मिका आणि विजय यांनी अजून त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. आता ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) मध्ये अभिनेत्री सारा अली खाननं (Sara Ali Khan) रश्मिका आणि विजयच्या नात्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. 

वाचा सविस्तर बातमी 

14:13 PM (IST)  •  15 Jul 2022

‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकांच्या सेटवर भीतीचं वातावरण

Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकांचा बोलबाला आहे. या मालिकांच्या कथानाकांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, सध्या या मालिकांच्या सेटवर भीतीचं वातवरण पसरलं आहे. या मालिकांच्या सेटवर भूताचा वावर असल्याची चर्चा सुरु आली आहे. या भूताने ‘आई कुठे काय करते’च्या ‘संजनाची आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘शालिनी’ची झोप उडवली आहे.

वाचा संपूर्ण बातमी

14:12 PM (IST)  •  15 Jul 2022

Rang Majha Vegla : दीपिकाला परत मिळवण्यासाठी दीपा लढणार कायदेशीर लढाई

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल क्रमांक मिळवला आहे. या मालिकेच्या कथानकात सध्या अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या मालिकेत सध्या अनेक घडमोडी घडत असून, कथेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य आता दीपाला कळलं आहे. त्यामुळे ती आता आपल्या मुलीला मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहे.

वाचा संपूर्ण बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Vision Worli : तुम्ही मुंबईचे मालक, रडता कशाला? राज ठाकरेंची कोळी बांधवांना सादTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 21 Sept 2024 : 6 PmAnandache Pan : आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारं पुस्तक 'स्वरस्वामिनी आशा' : 21 Sep 2024Vare NIvadnukiche Superfast : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट : 21 सप्टेंबर 2024 : 6 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
Embed widget