एक्स्प्लोर

भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आल्यामुळे महिलांना ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती याठिकाणी लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा संस्थापक शरद पवार (sharad pawar) यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाल्यामुळे आजही या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी (NCP) व शरद पवार कायम आग्रही असतात. बारामतीच्या डोर्लेवाडी गावातील एका कार्यक्रमादरम्यान आज पुन्हा एकदा शरद पवारांचा महिला (Women) सक्षमीकरण आणि महिलांचे राजकारणातील स्थान याबाबतचा आग्रह दिसून आला. येथील कार्यक्रमात पाठीमागे बसलेल्या महिला सरपंचांना (Sarpanch) पुढे बोलावून भाषण करण्यास शरद पवारांनी सांगितले. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आल्यामुळे महिलांना ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती याठिकाणी लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात नाव महिलांचे असते, पण कारभार तिचा पतीच हाकत असतो. सरपंचपदी महिला असते, पण कार्यक्रमात सरपंचाच्या खुर्चीवर महिलेचा पती असतो. बारामतीधील एका कार्यक्रमात ही बाब लक्षात येताच, शरद पवारांनी संबंधितांचे चांगलेच कान टोचले. 

आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली ती मागे बसायला दिली का? अशा शब्दात शरद पवारांनी डोर्लेवाडीच्या महिला सरपंचांना प्रश्न केला. शरद पवार आज बारामती डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरपंच यांचे पती पुढे बोलत होते. म्हणून, शरद पवारांनी विचारलं सरपंच कुठं आहेत? सरपंचाला पुढे बोलवा असे आदेशच शरद पवार यांनी दिले. डोर्लेवाडीच्या महिला सरपंच पुढे आल्यावर शरद पवारांनी त्यांना याबाबत विचारणा देखील केली.  आम्ही तुम्हाला सत्ता दिली आहे, ती मागे बसायला दिली का, असा परखड सवाल महिला सरपंचांना विचारला आणि महिला सरपंचास पुढे बसवलं. शरद पवारांच्या या कृतीचं डोर्लेवाडी गावात कौतूक करण्यात येत असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्या या कृतीचं कौतूक होत आहे. 

रयत शिक्षण संस्थेला निधी

माझ्या वडिलांनी माझं नाव एमईएस शाळेतून काढले आणि मला रयतच्या शाळेत टाकलं. परदेशात देखील मला रयतमध्ये शिकलेले विद्यार्थी-विद्यार्थीनी भेटतात. रयतकडून संस्थेसाठी मी दीड कोटी रुपये निधी देतो, अजून एक संस्था आहे त्याच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे आहेत, त्यांच्याकडून 3 कोटी रुपये दिले, असे म्हणत शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी देण्यात येत असलेल्या आर्थिक निधीसंदर्भात माहिती दिली. तसेच, माझे डोर्लेवाडी गावात अनेक वर्गमित्र आहेत, या गावात मी कधी मत मागितले नाही, पण तुम्ही कधी द्यायला विसरला नाहीत, असेही शरद पवार यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 09 PM TOP Headlines : 9 PM 21 September 2024Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वरPrataprao Jadhav On Electricity : 'माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि मी कधीच वीज बिल भरलं नाही'- जाधवPrakash Ambedkar On Vidhansabha Seats : प्रकाश आंबेडकरांकडून विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य, तांत्रिक अडचणीमुळे सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला पार पडणार
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Embed widget