एक्स्प्लोर

Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती, 696 जागांसाठी प्रक्रिया सुरु

ADCC Bank Recruitment 2024 : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या बँकेनं अर्ज मागवले आहेत.

अहमदनगर :  राज्यातील विविध जिल्हा बँकांकडून सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे विविध पदांसठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये अहमदनगर येथील जिल्हा बँकेनं देखील 696 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे 696 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे क्लार्क, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक ही पदं भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारंनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  

पात्र उमेदवारांनी अहमदगर जिल्हा बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 27 सप्टेंबर 2024 असा आहे. 

क्लार्क पदासाठी 687,वाहनचालक 4 आणि सुरक्षारक्षकांची 5 पदं भरली जाणार आहेत. पुढील काळात या पदांमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करायचे आहेत. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी कोणतंही सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असणार नाही. 

क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय एमएसआयटी किंवा सीसीसी झालेलं असणं आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रातील उच्च शिक्षण असणाऱ्या आणि बँकेतील कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. 

वाहन चालक असलेल्या उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झालेलं आवश्यक आहे. याशिवाय त्याचकडे एलएमव्ही लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. 

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे. क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जीएसटीसह 749 तर वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 696 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

निवड पद्धती

अहमदनगर जिल्हा बँकेकडून परीक्षेनंतर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना एक वर्षांचा परीक्षाविधीन कालावधी पूर्ण करावा लागेल. क्लार्क पदावर ज्यांची निवड होईल त्यांना 15 हजार तर, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांना प्रत्येकी 12 हजार रुपये  दरमहा वेतन दिलं जाईल.   अहमदनगर जिल्हा बँकेकडून उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल. ती परीक्षा 90 गुणांसाठी असेल. या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीला बोलावलं जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल यानंतर उमेदवारांना 10 गुणांच्या मुलाखतीला सामोरं जावं लागेल. लेखी परीक्षा आणि मुलाखत याच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.  

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Embed widget