Entertainment News Live Updates 14 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या अफवा?
सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) घटस्फोट घेणार अशा बातम्या असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा 'द मिर्झा मलिक शो' हा टीव्ही कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं होस्ट हे कपल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या या अफवा होत्या का? किंवा हे सर्व काही या शोच्या प्रमोशनसाठी होतं का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
Jitendra Awhad Exclusive : शिवाजी महाराजांसाठी फाशी झाली तरी चालेल
Jitendra Awhad : विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना हाणामारी करण्याचा माझा उद्देश नव्हता. मारामारी करणाऱ्या समर्थकांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच मी मारहाण केली नसल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अन्नासासाठी वनवन, फूटपाथवर झोपणं अन् त्वचेच्या रंगामुळे अपमान; मिथून चक्रवर्तींनी सांगितलं बॉलिवूड इंडस्ट्रीतील सत्य
मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले,"मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा एक वेळचं जेवण आणि कुठे झोपावं अशा गोष्टींचा विचार करावा लागत असे. कधी-कधी मी फूटपाथवरच झोपलो आहे. माझ्या आयुष्याची कथा, माझा संघर्ष कोणालाही प्रेरणा देणारा नाही. उलट मानसिक त्रास होईल. त्यामुळेच माझ्या आयुष्यावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही.
'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
गेल्या काही दिवसांत मनोरंजनविश्वातून वाईट बातम्या समोर येत आहेत. आता लोकप्रिय बॉलिवूडपट 'याराना'चे दिग्दर्शक राकेश कुमार (Rakesh Kumar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील अनेक सिनेमांचं दिग्दर्शन राकेश यांनी केलं आहे.
Salaam Venky: आई आणि मुलाच्या नात्याची कथा; काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Salaam Venky: अभिनेत्री काजोलच्या (Kajol) ‘सलाम वेंकी’ (Salaam Venkey) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बालदिनाच्या निमित्तानं हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केलं आहे. ‘सलाम वेंकी’ च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
Arbaaz Khan: 'सलमानचा भाऊ, मलायकाचा पती म्हटल्यावर...'; अरबाज खाननं व्यक्त केली खंत
Arbaaz Khan: प्रसिद्ध अभिनेता अरबाज खाननं (Arbaaz Khan) बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं. वेगवेगळ्या चित्रपट, वेब सीरिजमधून अरबाज प्रेक्षकांच्या भेटीस येतो. अरबाजनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. अरबाजनं सांगितलं की, मलायकाचा पती, सलमानचा (Salman Khan) भाऊ आणि सलीम खान (Salim Khan) यांचा मुलगा हे टॅग्स दिल्यावर त्याला वाईट वाटतं होतं.
View this post on Instagram
Shabbas Sunbai : 'शाब्बास सुनबाई' नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Shabbas Sunbai : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजपासून 'शाब्बास सुनबाई' (Shabbas Sunbai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहू पाहणाऱ्या एका ध्येयवादी सूनेची म्हणजेच संजीवनीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
View this post on Instagram
Sunil Shende Passed Away : सुनील शेंडे यांचं निधन
Sunil Shende Passed Away : मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Sunil Shende) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ अशा अनेक सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या.
Sharad Ponkshe : आपल्याला बाजीराव माहितेय तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा हेच दुर्देव : शरद पोंक्षे
Sharad Ponkshe On Bajirao Peshwa : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर ते त्यांची मतं सोशल मीडियावर मांडत असतात. आता शरद पोंक्षे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी बाजीराव पेशवे (Bajirao Peshwa) किती थोर होते हे सांगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram