एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 11 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 11 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

The Crew: 'द क्रू' चित्रपटाची घोषणा; तब्बू, करिना अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

The Crew: तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर 'लीडिंग लेडीज' कॉमिक कॅपर 'द क्रू' (The Crew) साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती 'वीरे दी वेडिंग'च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली असून, दर्शकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

Bigg Boss Marathi 4: टास्कमध्ये होणार तुफान राडा; बिग बॉसच्या घरात नवा ग्रुप तयार होणार ?

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये आज यशश्री, रोहित आणि रुचिरा नवा ग्रुप तयार व्हावा यावर चर्चा करताना दिसणार आहेत. यशश्रीचे म्हणणे आहे, मला एक कळत नाहीये जेव्हा सॅम आली होती तुमच्याकडे प्रोपोसल घेऊन कि आपण एक वेगळा ग्रुप तयार करूयात. पण त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात होतं ते. मी जेव्हा या ग्रुपमध्ये गेले होते. तेजू, अमृता, तू, मी आणि रोहित असा एक वेगळा ग्रुप असावा त्यात सॅम नव्हती कुठेही. सॅम जरी म्हणत असली ती वैयक्तिक खेळते तरी तिचा कल त्या ग्रुपकडे खूप जास्त आहे आणि ते तिला कधीपण परत खेचून आणू शकतात हे मी पाहिलं आहे. मला असं वाटतं तुम्हालाही खूप ग्रांटेड घेतलं जातं आणि सगळ्याच बाबतीत कि, जेव्हा हवं तेव्हा आपण त्यांना परत खेचून आणू शकतो. रुचिराचे त्यावर म्हणणे आहे, म्हणजे नॉमिनेट करायला आम्ही पाहिजे पण आमची कॅप्टीन्सी, किंवा container शिप गेली तर हे असताना कशी गेली? तिथे त्यांनी ती जपून ठेवली पाहिजे, पण यांना नॉमिनेट करताना आम्ही करू शकतो. आता रुचिराचा नक्की काय मुद्दाच आहे हे कळेलच आजच्या भागामध्ये .

Jeta : 25 नोव्हेंबर रोजी 'जेता' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नीतिश आणि स्नेहल साकारणार प्रमुख भूमिका

Jeta: चंदेरी दुनियेत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. कोणताही लेखक-दिग्दर्शक कथानक आणि कॅरेक्टरच्या आवश्यकतेनुसार कलाकारांची निवड करत असतो. यात मुख्य कलाकारांची निवड हा लेखक-दिग्दर्शकापुढील मोठा टास्क असतो. कथानकाची गरज ओळखून मुख्य भूमिकेत अचूक कलाकारांची निवड करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुढील प्रवास सोपा बनतो. यामुळे चित्रपटांमध्ये कधी जुन्याच जोड्या नव्या कॅरेक्टरमध्ये दिसतात, तर कित्येकदा नवीन जोड्या जुळवत कलाकार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. 'जेता'(Jeta) या आगामी मराठी चित्रपटात अशीची एक नवी कोरी जोडी रसिकांचं मनोरंजन करणार आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचल्यावर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा नीतिश चव्हाण आणि स्नेहल देशमुख यांची जोडी 'जेता'चं मुख्य आकर्षण बनली आहे. 

16:32 PM (IST)  •  11 Nov 2022

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन; जीममध्ये वर्कआऊट करताना आला हृदयविकाराचा झटका

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झाला आहे. सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास 45 मिनिटे सिद्धांत वीर सूर्यवंशीवर रुग्णालयात करण्यात आले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.  

13:23 PM (IST)  •  11 Nov 2022

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'दयाबेनच्या भूमिकेसाठी दिलं ऑडिशन पण...'; अभिनेत्री काजलनं सांगितला किस्सा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीच्या (Disha Vakani) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण गेल्या पाच वर्षांपासून दिशा ही या मालिकेमध्ये काम करत नाहीये. अभिनेत्री काजल पिसाळ (Kajal Pisal) ही दयाबेन ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर होत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये काजलनं दयाबेन या भूमिकेबाबत सांगितलं. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝐊𝐀𝐉𝐀𝐋 𝐏𝐈𝐒𝐀𝐋 (@pisalkajal)

12:27 PM (IST)  •  11 Nov 2022

Sania Mirza,Shoaib Malik: पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया मिर्झाचा घटस्फोट? शोएब मलिकसोबतचे फोटो व्हायरल

Sania Mirza,Shoaib Malik:  भारतीय टेनिसपटू (Indian Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सध्या शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबतचे (Ayesha Omar) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयशाचं नाव शोएबसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे  आयशा आणि शोएब यांच्या नात्याची चर्चा ही सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाचं कारण आहे का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

11:22 AM (IST)  •  11 Nov 2022

Friday OTT and Theatre Releases: थिएटर आणि ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; या वीकेंडला पाहा चित्रपट आणि वेब सीरिज

Friday OTT and Theatre Releases: आज (11 नोव्हेंबर) काही चित्रपट आणि वेब सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत तर काही चित्रपट हे मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेत्री समांथा रुथ प्रभुचा (Samantha) 'यशोदा' (Yashoda) हा चित्रपट आणि अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ऊंचाई (Uunchai) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. तसेच मार्व्हल युनिवर्सचा ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर हा चित्रपट देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जाणून घेऊयात आज ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होणारे चित्रपट तसेच ओटीटीवर रिलीज होणाऱ्या काही वेब सीरिज...

'यशोदा'

ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर

10:25 AM (IST)  •  11 Nov 2022

Lata Mangeshkar: ड्रेकच्या कॉन्सर्टमध्ये लतादीदींचं गाणं; 'दीदी तेरा देवर दिवाना' चं रिमिक्स व्हर्जन ऐकून नेटकरी भडकले

Lata Mangeshkar:  दिवंगत गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या गाण्यांना देशातीलच नाही तरी परदेशातील प्रेक्षकांची पसंती मिळते. लतादीदींच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लतादीदींच्या 'दीदी तेरा देवर दिवाना' या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन ऐकायला येत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Chirag Gandhi (@dj_realest)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget