Entertainment News Live Updates 06 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Majha Katta : 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Majha Katta : 'एबीपी माझा'च्या महाकट्टा या कार्यक्रमात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) आणि लेखक प्रशांत दळवी (Prashant Dalvi) ही जोडगोळी सहभागी झाली. दरम्यान चंद्रकांत कुलकर्णी यांनी मोठी घोषणा केली. 'एबीपी माझा'च्या 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एबीपी माझाच्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर केलं आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांभाळली होती.
Shah Rukh Khan : किंग खानच्या 'Pathaan'ने रचला नवा विक्रम; आता बांगलादेशात होणार प्रदर्शित!
Shah Rukh Khan Pathaan Movie Latest Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर आता या सिनेमाने नवा विक्रम रचला आहे. बांगला देश (Bangladesh) स्वतंत्र झाल्यानंतर प्रदर्शित होणारा 'पठाण' हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे.
Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट
Chowk Movie Trailer Out : 'चौक' (Chowk) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरला 2,61,303 व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा ट्रेलर व्हायरल होत आहे.
Balgandharva Movie: नारायण श्रीपाद राजहंस' यांचा खडतर प्रवास मांडणाऱ्या 'बालगंधर्व' ला 12 वर्ष पूर्ण; सुबोध भावे, रवी जाधव यांची खास पोस्ट
Balgandharva Movie: 'बालगंधर्व' हे नाव रंगभूमीप्रेमी तसेच नाट्य रसिकाच्या मनातलं सोनेरी पानं. नारायण श्रीपाद राजहंस यांची कथा "बालगंधर्व" (Balgandharva) या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावर अभिनय सादर करण्यास समाज मान्यता नव्हती त्याच काळात स्त्री भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा प्रवास "बालगंधर्व" या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होऊन 12 वर्ष झाली आहेत. या निमित्तानं अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
Natya Parishad : नाट्यपरिषदेचा अध्यक्ष प्रशांत दामले की प्रसाद कांबळी?
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. या निवडणुकीनंतर नाट्यपरिक्षदेचा अध्यक्ष कोण होणार याची नाट्यवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. आता अध्यक्षपदाची निवडणुक येत्या काही दिवसांत पार पडणार आहे.
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'जवान'ची रिलीज डेट ढकलली पुढे;
Shah Rukh Khan Jawan Release Date : 'पठाण' (Pathaan) सिनेमानंतर शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
Rhea Chakraborty : 'रोडीज 19'मधून रिया चक्रवर्तीचा पत्ता होणार कट?
Gautam Gulati And Prince Narula Refuse To Shoot With Rhea Chakraborty : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'रोडीज'चं (Roadies) नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनू सूद हा कार्यक्रम होस्ट करणार असून प्रिन्स नरुला (Prince Narula), गौतम गुलाटी (Gautam Gulati) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) या कार्यक्रमात गॅंग लिडरच्या भूमिकेत दिसणार होते. पण आता गौतम आणि प्रिन्सने रियासोबत शूटिंग करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 'रोडीज 19'मधून रिया चक्रवर्तीचा पत्ता कट झाल्याचं म्हटलं जात आहे.
Marathi Serial : 'आई कुठे काय करते' की 'ठरलं तर मग'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी!
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...