Rhea Chakraborty : 'रोडीज 19'मधून रिया चक्रवर्तीचा पत्ता होणार कट? 'या' परीक्षकांनी अभिनेत्रीसोबत शूटिंग करण्यास दिला नकार
Rhea Chakraborty : 'रोडीज 19' या कार्यक्रमाच्या माध्यमातून रिया चक्रवर्ती छोट्या पडद्यावर कमबॅक करणार होती. पण आता ती कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
Gautam Gulati And Prince Narula Refuse To Shoot With Rhea Chakraborty : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'रोडीज'चं (Roadies) नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनू सूद हा कार्यक्रम होस्ट करणार असून प्रिन्स नरुला (Prince Narula), गौतम गुलाटी (Gautam Gulati) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) या कार्यक्रमात गॅंग लिडरच्या भूमिकेत दिसणार होते. पण आता गौतम आणि प्रिन्सने रियासोबत शूटिंग करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 'रोडीज 19'मधून रिया चक्रवर्तीचा पत्ता कट झाल्याचं म्हटलं जात आहे.
'रोडीज 19' (Roadies 19) या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांमध्ये या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे. पण या कार्यक्रमामधून रिया चक्रवर्तीचा पत्ता कट झाल्याने चाहते नाराज झाले आहेत. प्रेक्षक 'रोडीज 19'च्या निर्मात्यांना ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटीने रिया चक्रवर्तीसोबत शूटिंग करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. प्रिन्स आणि गौतम रियासोबत काम करणार असल्याने त्यांचे चाहते नाराज झाले होते. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना रियासोबत शूटिंग करावं, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा नव्हती.
'रोडीज 19' 'या' दिवशी होणार सुरू
'रोडीज 19' या बहुचर्चित कार्यक्रमाचं येत्या 3 जूनपासून प्रसारण होणार आहे. 3 जूनपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे आता रिया चक्रवर्ती आलेल्या अडचणींवर मात करणार की या कार्यक्रमातून तिला पट्टा कट होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आहे. सुशांतच्या आत्महत्येला रिया जबाबदार असल्याचं म्हटलं गेलं होतं. ड्रग्स प्रकरणामुळेदेखील ती चर्चेत होती.
रिया चक्रवर्ती कोण आहे? (Who Is Rhea Chakraborty)
रिया चक्रवर्तीने 2012 साली 'तुनिगा तुनिगा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘सोनाली केबल’, ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘बँक चोर’, ‘चेहरे’ आणि ‘जलेबी’ या सिनेमांत ती झळकली आहे. रिया वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.
संबंधित बातम्या