एक्स्प्लोर

Natya Parishad : नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले की प्रसाद कांबळी? 'या' दिवशी होणार निवडणूक

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक येत्या काही दिवसांत पार पडणार आहे.

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. या निवडणुकीनंतर नाट्यपरिक्षदेचे अध्यक्ष कोण होणार याची नाट्यवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. आता अध्यक्षपदाची निवडणुक येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. 

नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची निवडणूक 'या' दिवशी पार पडणार (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election)

नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची निवडणूक कधी पार पडणार याकडे नाट्यप्रेमींचं लक्ष लागलं होतं. येत्या 16 मे ला ही निवडणूक होणार आहे. अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) आणि नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्यात नाट्यपरिषदेच्या अध्यपदासाठी चढत होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता कोणाचं नाणं खणखणीत वाजणार याकडे नाट्यसृष्टीचं लक्ष लागलं आहे. 

नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची निवडणूक होणार आहे. नाट्यपरिक्षदेचा अध्यक्ष आणि कार्यवाही यांच्यासह प्रशासन आणि उपक्रमासाठी दोन उपाध्यक्ष या निवडणुकीत निवडले जातील. त्यांसह तीन सहकार्यवाह, एक कोषाध्यक्ष आणि 11 सभासददेखील निवडले जाणार आहेत. एकूण 19 जागांसाठी मतदान केले जाणार आहे. 

अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्यात चांगलीच लढत

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यात अविनाश नारकर, अजित भुरे, वीणा लोकूर, भाऊसाहेब भोईर, शैलेश गोजमगुंडे, सतीश लोटके, समीर इंदुलकर, सुकन्या कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर, सविता मालपेकर, सुशांत शेलार यांच्यासह अनेक उमेदवारांचा समावेश आहे. पण या सगळ्यांमध्ये अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्यात चांगलीच लढत होणार आहे. 

नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले, अजित भुरे आणि प्रसाद कांबळी या नावांची चर्चा आहे. तसेच अभिनेता सुशांत शेलारनेदेखील अध्यपदी विराजमान व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकांनंतर प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह पॅनल'मधील उमेदवारांमध्ये धुसपूस सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. यात रंगकर्मी नाटक समूहाच्या पॅनलल मुंबईतील 10 पैकी 8 जागा, तर प्रसाद कांबळींच्या 'आपलं पॅनल'ला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. आता नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरुन राजकीय अंक; अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि उदय सामंत यांची युती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget