एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 05 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 05 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

अनिरुद्धच्या विचित्र वागण्यामुळे संजनाचा राग अनावर; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte:   आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात.  'आई कुठे काय करते !' या मालिकेमध्ये आता संजना आणि अनिरुद्धचं भांडण झालं आहे. नुकताच आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संजना आणि अनिरुद्ध हे एकमेकांसोबत भांडण करत आहेत. आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की , अभिषेक हा ईशा आणि यश यांच्यासोबत गप्पा मारत बसला आहे. त्यानंतर तिथे संजना ओरडत येते.  आजी संजनाला विचारते की, 'संजना, तू रात्री गेलेली आता घरी येत आहेस?' त्यानंतर अनिद्ध संजनाला म्हणतो, 'झाली का मजा करुन? ' यावर संजना म्हणते, ' माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन तोंडाला येईल ते बोलायची तुझी हिंमत कशी झाली?' 

Swapnil Mayekar Death:  दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन

Swapnil Mayekar Death:  लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर (Swapnil Mayekar) यांचे निधन झाले आहे.  गेले काही महिने ते आजारी होते. त्यांचा मराठी पाऊल पडते पुढे (Marathi Paul Padate Pudhe) हा चित्रपट उद्या (5 मे) प्रदर्शित होणार होता. पण त्याआधीच स्वप्नील मयेकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे.  मराठी पाऊल पडते पुढे  हा स्वप्नील मयेकर यांचा  स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होते. स्वप्नील मयेकर यांनी वयाच्या  46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

स्वप्नील मयेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. स्वप्निल यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांच्या निधनानं अता मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंनी पोस्ट शेअर करुन दिली हेल्थ अपडेट

Amol Kolhe :  डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. कराडमधील कल्याणी मैदानावर झालेल्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना दुखापत झाली. या प्रयोगादरम्यान घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.  पण मस्ट गो ऑन म्हणत त्यांनी पुढे प्रयोग सादर केला. आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेल्थ अपडेट दिली आहे.

13:52 PM (IST)  •  05 May 2023

Khupte Tithe Gupte : मुहूर्त ठरला! अवधूत गुप्तेचा 'खुप्ते तिथे गुप्ते' या दिवशी होणार सुरू

Khupte Tithe Gupte : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची गणना होते. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. तसेच हा कार्यक्रम कधी सुरू होणार याचीदेखील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर येत्या 4 जूनपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

13:28 PM (IST)  •  05 May 2023

Anushka Sharma Cannes 2023 Debut: ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला अनुष्का लावणार हजेरी? फ्रान्सच्या राजदूतांनी शेअर केलेल्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Anushka Sharma Cannes 2023 Debut:  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.सध्या अनुष्का एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी ट्विटरवर विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का ही लवकरच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये  डेब्यू करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

13:22 PM (IST)  •  05 May 2023

Majha Katta : 'कट्यार' सिनेमा करण्यासाठी शंकर महादेवन यांनी दिलेला नकार

Shankar Mahadevan Majha Katta : एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांच्यासोबत गप्पांची अनोखी मैफिल रंगली. 'कट्यार' सिनेमा करण्यासाठी शंकर महादेवन यांनी आधी नकार दिला होता. पण सुबोध भावेने (Subodh Bhave) समजूत घातल्यानंतर त्यांनी हा सिनेमा बनवण्याचं ठरवलं आणि 'सूर निरागस हो' (Sur Niragas Ho) हे गाणं रेकॉर्ड झालं. 

Majha Katta : 'कट्यार' सिनेमा करण्यासाठी शंकर महादेवन यांनी दिलेला नकार; 'माझा महाकट्ट्या'वर सांगितला किस्सा

12:43 PM (IST)  •  05 May 2023

Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार पोहोचला; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत एक भावनिक वळण आलं आहे. मल्हार आणि मंजुळा  हे समोरासमोर येणार आहे. मल्हारनं स्वराजला दिलेल्या माउथ ऑर्गनमध्ये मंजुळानं हिरे ठेवले आहेत. आता मंजुळा आणि स्वराजला काही गुंडांनी पकडले आहे. स्वराजला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी मल्हार तिथे गेला आहे. तिथेच मल्हार आणि मंजुळाची भेट होणार आहे. सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मल्हार हा गुंडांसोबत फायटिंग करताना दिसत आहे.

 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

09:40 AM (IST)  •  05 May 2023

Aai Kuthe Kay Karte : "तू कमवायला लागली की सगळे चोचले कर"; कांचनताई ईशाची करणार कानउघडणी

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नसोहळ्यानंतर मालिकेत आता ईशाच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ईशा लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेच्या आगामी भागात ईशाच्या साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळेल. दरम्यान "तू कमवायला लागलीस की सगळे चोचले कर", अशी कांचनताई ईशाला समज देणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget