Majha Katta: लग्न करायचं होत आचाऱ्याशी झालं राज ठाकरेंशी, काय आहे शर्मिला ठाकरेंच्या लग्नाचा किस्सा?
एबीपी माझाच्या महाकट्टा (Majha Katta) कार्यक्रमात राज ठाकरे आणि त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्याशी विविध मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा रंगल्या. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मुंबई : शर्मिला ठाकरेंचा (Sharmila Thackeray) ताईची मैत्रीण असल्यामुळे लग्नाआधी कायम वावर असायचा. त्यामुळे ओळख ही आधीपासूनच होती. एकदा गप्पा मारताना मला स्वयंपाकाचा कंटाळा असून मी आचाऱ्याशी लग्न करेल असे शर्मिला ठाकरे म्हणाल्याची आठवण राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मातोश्री कुंदा ठाकरे यांना सांगितली. एबीपी माझाच्या महाकट्टा (Majha Katta) कार्यक्रमात राज ठाकरे आणि त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्याशी विविध मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा रंगल्या. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे.. त्यांच्या राजकीय मुलाखती अनेक आहेत. पण राज ठाकरे लहान असताना कसे होते? त्यांच्या शालेय जीवनातले किस्से, कॉलेजमध्ये असताना केलेल्या करमाती, अशी सगळी गुपितं त्यांची जन्मदात्री आई, कुंदाताई ठाकरे यांनी कट्ट्यावर उलगडली. राज यांच्या आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत राज ठाकरे आणि त्यांच्या आईसोबत त्यांच्याच घरी एबीपी माझाचा महाकट्टा रंगला.
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा किस्सा सांगताना राज ठाकरेंच्या मातोश्री म्हणाल्या, शर्मिला ठाकरेंशी राजच्या लग्नाचे ठरल्यानंतर माझी बहिण म्हणाली या मुलीशी राज लग्न करतोय पण हिला स्वयंपाक करयला आवडत नाही. ही आचाऱ्याशी लग्न करणार असं म्हणाली होती. पण आता हळूहळू सर्व स्वयंपाक करायला ती शिकली आहे. आता सगळ ती उत्तम सांभाळते. मला देखील लग्नाअगोदर काही करता येत नव्हते. लग्न झाल्यानंतर मी सगळा स्वयंपाक करायला शिकले.
माझी सासू गुणी आहे
यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझी सासू गुणी आहे. आम्हाला त्यांनी सांभाळून घेतले आहे. जेव्हा माझा लग्न जमले नव्हते त्यावेळी मी त्यांना सांगितले होते. मी मॉर्डन मुलगी होती. त्यांनी मला सांभाळून घेतले आहे. मी देखील मितालीशी तसाच वागण्याचा प्रयत्न करत आहे.
आईच्या हातचे कोळंबीचे कालवण आवडते
आईच्या हातचे कोणते पदार्थ आवडतात हे सांगताना राज ठाकरे म्हणाले, आईने बनवलेले कोळंबीचे कालवण मला आवडते. तसेच बोंबलाची भजी देखील मला आवडते. आजही मला आईच्या बनवलेला एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर आई आजही माझ्यासाठी बनवते.
राज ठाकरे यांच्या आईंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी दहावीचा निकाल लागला त्या दिवशीचा एक प्रसंग सांगितला. दहावीचा निकाल लागला तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या आईला मी नापास झाल्याचं सांगितला. तेव्ही ती रडायला लागली होती. नंतर बाळासाहेब माझ्याशी मस्करी करत होते, हे लक्षात आलं.
पाहा व्हिडीओ :