Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 Jun 2023 05:05 PM
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी-2 मध्ये होणार 'या' गायकाची एन्ट्री? चर्चेला उधाण
Bigg Boss OTT 2:  बिग बॉस ओटीटी 2 मध्ये एक गायक सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. Read More
Aryan Shahrukh Khan : आर्यन खानच्या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात; लेकाला शुभेच्छा देण्यासाठी शाहरुख सेटवर हजर
Aryan Khan : आर्यन खानच्या आगामी वेबसीरिजच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. Read More
AR Rahman: शंकर महादेवन ए.आर.रहमानबद्दल म्हणाले, '28 वर्षांत त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून बदल झाला नाही...'
28 वर्षांमध्ये  ए.आर. रहमान यांच्यामध्ये व्यक्ती म्हणून बदल झाला नाही, असं शंकर महादेवन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. Read More
Bigg Boss OTT 2 : सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये अभिजीत सावंतची एन्ट्री

Bigg Boss OTT 2 : सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी 2' या कार्यक्रमात आता अभिजीत सावंतची एन्ट्री झाली आहे. या आठवड्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Leonardo Dicaprio : हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो 'या' भारतीय मॉडेलच्या पडलाय प्रेमात? चर्चेला उधाण
Leonardo Dicaprio : हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो सध्या नीलम गिल या मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे. Read More
South Films On OTT:साऊथ इंडियन चित्रपट बघायला आवडतात? घरबसल्या ओटीटीवर पाहा जबरदस्त अॅक्शन असणारे 'हे' चित्रपट
South Films On OTT: तुम्हाला साऊथ इंडियन चित्रपट आवडत असतील तर तुम्ही जबरदस्त अॅक्शन असणारे चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. Read More
Adipurush : प्रभासच्या 'आदिपुरुष'चा रिलीजआधीच धमाका, रिलीजआधीच केली 432 कोटींची कमाई!
Adipurush : प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More
Milind Gawali: 'एक छोटीशी परी तुमच्या घरी येते आणि...'; लेकीच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी यांची खास पोस्ट
Milind Gawali: मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी  त्यांच्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.  Read More
Odisha Train Accident : सलमान खान, सोनू सूद ते ज्युनियर एन्टीआर; ओडिशातील रेल्वे अपघातातवर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
Odisha Trian Accident : ओडिशातील रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला असून आता बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील या घटनेची दखल घेतली आहे. Read More
The Kapil Sharma Show:  'द कपिल शर्मा शो' च्या मंचावर विनोदाचे चौकार अन् षटकार; क्रिकेटर ब्रेट ली आणि ख्रिस गेल लावणार हजेरी
क्रिकेटर ब्रेट ली (Brett Lee) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली आहे.  Read More
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने मुंबईत खरेदी केला 190 कोटी रुपयांचा आलिशान बंगला; यश चोप्रा आहे शेजारी
Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेलाने मुंबईत एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. Read More
Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary: बिग बी आणि जया बच्चन यांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस; मुलगी श्वेता आणि नात नव्यानं शेअर केली खास पोस्ट
Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary: बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.  Read More
Malaika Arora Pregnancy Rumours : मलायका अरोरा प्रेग्नंट? अर्जुन कपूर म्हणतो, "आम्ही..."
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून आता अर्जुन कपूरने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. Read More
Marathi Actress : हातात मेथीची जुडी, चेहऱ्यावर स्कार्फ; कर्जतच्या बाजारात भाजी घेणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री कोण?
Jui Gadkari : मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीचा कर्जतच्या बाजारात खरेदी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; देशमुखांच्या घरात घुसून चोराचा इशावर जीवघेणा हल्ला
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत देशमुख कुटुंबीय सध्या अनेक अडचणींचा सामना करताना दिसत आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल


Shah Rukh Khan And Salman Khan Video Leak From Tiger 3 Set : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाचं शूटिंग करत आहे. 'पठाण' (Pathaan) या सिनेमानंतर शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा बॉलिवूडचा बादशाह आणि भाईजानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'टायगर 3'च्या सेटवरील शाहरुख खान आणि सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने चॉकलेटी रंगांचं टी-शर्ट आणि जीन्स परिधान केलेली दिसत आहे. तर दुसरीकडे शाहरुखच्या 'पठाण'लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


Zara Hatke zara Bachke: कसा आहे सारा आणि विकीचा जरा हटके जरा बचके? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...


Zara Hatke zara Bachke: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan) 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) यांचा हा  चित्रपट रिलीज झाला आहे. विकी-साराचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते.  सध्या अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर करत आहेत. नेटकऱ्यांना  'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कसा वाटला? ते जाणून घेऊयात...


सारा आणि विकी यांच्या 'जरा हटके जरा बचके'  या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  एका नेटकऱ्यानं या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. त्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, आज मी माझ्या मुलीसोबत जरा हटके जरा बचके हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात  विकी कौशल आणि सारा आली खान यांची कॉमेडी प्रेक्षकांसोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर चित्रपटात इमोशन अँगल देखील आहे.' या नेटकऱ्यानं या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.