Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary: बिग बी आणि जया बच्चन यांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस; मुलगी श्वेता आणि नात नव्यानं शेअर केली खास पोस्ट
Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary: बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा आज लग्नाचा 50 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं अनेक जण सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहेत. बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
श्वेता बच्चननं अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'हॅप्पी 50, आता तुम्ही "गोल्डन" आहात. एकदा माझ्या आईला विचारण्यात आलं की, सुखी संसाराचं सिक्रेट काय असते? तेव्हा तिनं उत्तर दिले, प्रेम. मला वाटतं की, माझे वडील हे पत्नी नेहमीच बरोबर असते, असा विचार करतात.'
View this post on Instagram
श्वेताची मुलगी नव्यानं देखील सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एका चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केला. तसेच बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, '50 वर्ष झाली आहेत. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आदर याबद्दल मी तुमचे आभार मानतो. '
1973 मध्ये जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी लग्नगाठ बांधली. सिलसिला, अभिमान, बन्सी बिरजू, कभी खुशी कभी गम या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी काम केले. बिग बी आणि जया बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
अमिताभ बच्चन हे प्रोजेक्ट- के या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबतच दीपिका पादुकोण आणि प्रभास हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. तसेच जया बच्चन यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट देखील 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :