Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी-2 मध्ये होणार 'या' गायकाची एन्ट्री? चर्चेला उधाण
Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी 2 मध्ये एक गायक सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे.
Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 (Bigg Boss OTT 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा शो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता बिग बॉस ओटीटी 2 मध्ये एका गायकाची एन्ट्री होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
गायक अभिजीत सावंत होणार बिग बॉस ओटीटी 2 मध्ये सहभागी?
गायक अभिजीत सावंत हा बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अभिजीत हा इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. आता तो बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.याबाबत अभिजीतनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
View this post on Instagram
दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली होती. आता या सीझनच्या दुसऱ्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होतील? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
'बिग बॉस ओटीटी' मध्ये कोणते स्पर्धक होणार सहभागी?
'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये काही प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत, असे म्हटले जात आहे. 'लॉक अप'चा विजेता मुनव्वर फारुकी देखील बिग बॉस ओटीटी-2 मध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. मुनव्वर व्यतिरिक्त अर्चना गौतमचा भाऊ गुलशन देखील 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये सहभागी होणार आहे, अशी चर्चा आहे. गुलशन 'बिग बॉस 16' मध्ये त्याची बहीण अर्चना गौतम कुटुंबातील सदस्य म्हणून गेला होता. अजून बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
'बिग बॉस ओटीटी सीझन 2' चे होस्टिंग सलमान खान करणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन करण जोहर यानं केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्य:
सलमानच्या 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये सहभागी होणार? आदित्य नारायण पोस्ट शेअर करत म्हणाला...