AR Rahman: शंकर महादेवन ए.आर.रहमानबद्दल म्हणाले, '28 वर्षांत त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून बदल झाला नाही...'
28 वर्षांमध्ये ए.आर. रहमान यांच्यामध्ये व्यक्ती म्हणून बदल झाला नाही, असं शंकर महादेवन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
![AR Rahman: शंकर महादेवन ए.आर.रहमानबद्दल म्हणाले, '28 वर्षांत त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून बदल झाला नाही...' AR Rahman is the same god-fearing man he was 28 yrs ago said Shankar Mahadevan AR Rahman: शंकर महादेवन ए.आर.रहमानबद्दल म्हणाले, '28 वर्षांत त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून बदल झाला नाही...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/03/53523fec6e49649e14c793614a6101c01685783282002259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
AR Rahman: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) हे त्यांच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांनी 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉम्बे' या चित्रपटाच्या साउंडट्रॅकसाठी ए.आर. रहमान (AR Rahman) यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले. 'बॉम्बे' हा चित्रपट रिलीज होऊन 28 वर्ष झाली आहेत. या 28 वर्षांमध्ये ए.आर. रहमान यांच्यामध्ये व्यक्ती म्हणून बदल झाला नाही, असं शंकर महादेवन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, '28 वर्षांत रहमानमध्ये एक व्यक्ती म्हणून फारसा बदल झालेला नाही, तो अजूनही तसाच विनम्र व्यक्ती आहे. फक्त तो आता लाजाळू राहिलेला नाही. तो आता अधिक "धैर्यवान" झाला आहे. मंचावरचा त्याचा आत्मविश्वास दहापटीने वाढला आहे. '
पुढे शंकर महादेव यांनी सांगितलं की, "तो आधी जसा लाडका, विनम्र व्यक्ती होता. तसाच तो अजूनपर्यंत आहे. तो नेहमीच एका संगीताच्या विद्यार्थ्याप्रमाणे वगतो. एक संगीतकार म्हणून तो किती सुंदरपणे ग्रो होत आहे हे तुम्ही पाहू शकता.”
View this post on Instagram
बॉम्बे चित्रपटाला रहमानने दिलेल्या संगीताचे देशभरात कौतुक झाले. या चित्रपटातील कहना ही क्या आणि तू ही रे या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'बॉम्बे' या चित्रपटाचं मणिरत्नम (Mani Ratnam) यांनी दिग्दर्शन केलं होतं.
ए.आर. रहमान (AR Rahman) यांनी 'दिल से', 'ख्वाजा मेरे ख्वाजा', 'जय हो''बॉम्बे', 'रंगीला', 'दिल से', 'ताल', 'जींस', 'पुकार', 'फिजा', 'लगान', 'स्वदेस', 'जोधा-अकबर', 'युवराज', 'स्लमडॉग मिलेनियर' आणि 'मोहेंजो दारो' या चित्रपटांना संगीत दिलं. तसेच एआर रहमान यांनी 1992 मध्ये 'रोजा' चित्रपटात संगीत दिले.
View this post on Instagram
शंकर महादेवन यांनी अनेक हिट गाणी गायली आहे. शंकर महादेवन यांनी हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटांमधील गाणी देखील गायली आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
A. R. Rahman: संगीताचा बादशाह असणाऱ्या 'ए.आर.रहमान' यांचं खरं नाव माहितीये? हिट गाण्यांना दिलं संगीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)