The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' च्या मंचावर विनोदाचे चौकार अन् षटकार; क्रिकेटर ब्रेट ली आणि ख्रिस गेल लावणार हजेरी
क्रिकेटर ब्रेट ली (Brett Lee) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली आहे.
Brett Lee And Chris Gayle In The Kapil Sharma Show: छोट्या पडद्यावरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. सध्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, क्रिकेटर ब्रेट ली (Brett Lee) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली आहे.
द कपिल शर्मा शोच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कपिल शर्मा हा ब्रेट ली आणि ख्रिस गेल यांचे शोमध्ये स्वागत करतो. त्यानंतर तो दोघांना विचारतो की, 'तुम्हाला आठवतंय की तुम्ही आमच्या शोमध्ये आला होता त्यावेळी शोमध्ये सिद्धूजी होते?' पुढे कपिलने विचारले की, 'तुम्ही त्याला मिस करत आहात का?' कपिलच्या या प्रश्नावर ख्रिस उत्तर देतो, 'नाही.' त्यानंतर ब्रेटली म्हणतो,'सुंदर मुलीसमोर बसलेली चांगली दिसते.'
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
द कपिल शर्मा शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. काही सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात. ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे, असं म्हटलं जात होतं. आता 'हा शो खरच बंद होणार आहे का?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये कपिलला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत कपिल म्हणाला, 'हे अजून निश्चित झालेले नाही. आम्हाला जुलैमध्ये टूरसाठी यूएसएला जायचे आहे आणि नंतर आम्ही याबबात विचार करु. अजून बराच वेळ आहे.'
'कपिल शर्मा शो' मध्ये मोटिव्हेशनल स्पीकर, गायक, तसेच सेलिब्रिटींनी हजेरी लावतात. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. 'द कपिल शर्मा शो' या शोमध्ये काही दिवसांपूर्वीअभिनेत्री मंदाकिनी (Mandakini), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी हजेरी लावली होती.
संबंधित बातम्या