
Adipurush : प्रभासच्या 'आदिपुरुष'चा रिलीजआधीच धमाका, रिलीजआधीच केली 432 कोटींची कमाई!
Adipurush : प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Prabhas kriti Sanon Adipurush Movie : प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 16 जून 2023 रोजी हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने 432 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे.
'आदिपुरुष'ने केली 432 कोटींची कमाई!
मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजआधीच 432 कोटींचा गल्ला जमवला आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या सिनेमाने रिलीजआधीच चांगलीच कमाई केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता 68 कोटी रुपयांची कमाई केल्यास या सिनेमाचं बजेट पूर्ण होईल.
View this post on Instagram
'आदिपुरुष' पहिल्याच दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
प्रभास आणि कृती सेननचा 'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. पण रिलीजच्या पहिल्या दिवशीच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेप्रेक्षकांचा 'आदिपुरुष' या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील सिनेप्रेमी या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमावर टीका होत आहे. पण तरीही देशभरातील सिनेप्रेमींना या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळ्या ओम राऊतने (Om Raut) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सैफ अली खानदेखील (Saif Ali Khan) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा देवदत्त नागेदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या बहुचर्चित सिनेमातील 'राम सिया राम' आणि 'जय श्री राम' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
संंबंधित बातम्या
Adipurush New Song : 'आदिपुरुष' सिनेमातील 'राम सिया राम' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! युट्यूबवर अल्पावधीतच मिळाले मिलियन व्ह्युज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
