एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates: डॉन-3 चा टीझर रिलीज, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates: डॉन-3 चा टीझर रिलीज, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Tamanna Bhatia Fan Video : सिक्युरिटीला न जुमानता चाहता गर्दीतून आला आणि थेट तमन्ना भाटियाचा  हात पकडला; मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

Tamanna Bhatia Fan Video : तमन्ना भाटीया सध्या चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळेही सध्या ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतेच तिचे कावाला हे आयटम साँग रिलीज झाले आहे. तमन्नाची एक खासियत आहे. ती आपल्या फॅन्सना कधीच नाराज करत नाही. कोणत्याही ठिकाणी ती गेली तरी तिच्या फॅन्ससोबत फोटो काढते. अशातच ती एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने  कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून तमन्नाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. 

Alia Bhat : आलिया भट्टचं 'हार्ट ऑफ स्टोन'ची अभिनेत्री गॅल गॅडोटशी खास कनेक्शन, हॉलीवूड अभिनेत्रीला शिकवला नमस्कार

Alia Bhat : एकीकडे आलिया भटचा "राॅकी और रानी की प्रेमकहानी" ने बाँक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली आहे आणि आता आलिया तिच्या आगामी चित्रपट हार्ट आॅफ स्टोन चित्रपटाची वाट पाहत आहे. लवकरच आलिया भट्ट हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट गेल गडोतला तेलुगु शिकवताना दिसत आहे.

Blackpink: ब्लॅकपिंक या के पॉप गर्ल ग्रुपनं इंडस्ट्रीमध्ये पूर्ण केली सात वर्ष; मेंबर्सनं शेअर केल्या खास पोस्ट

Blackpinkके पॉप गर्ल ग्रुप ब्लॅकपिंकने (BLACKPINK) इंडस्ट्रीमध्ये  7 वर्षे पूर्ण केली आहेत. ब्लॅकपिंक या बँडमध्ये जिसू, लिसा, रोज आणि जेनी हे चार सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांत, ब्लॅकपिंक ग्रुपच्या म्युझिक व्हिडीओ आणि गाण्यांनी YouTube आणि इतर प्लॅटफॉर्मवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.  2016 मध्ये या ब्लॅकपिंक  (BLACKPINK) बँडची सुरुवात झाली. ब्लॅकपिंकने इंडस्ट्रीमध्ये 7 वर्षे पूर्ण केल्याबद्दल या ग्रुपमधील मेंबर्सनं खास पोस्ट शेअर केली आहे.

16:59 PM (IST)  •  09 Aug 2023

Priya Berde: “ढोलकीच्या तालावर” च्या मंचावर प्रिया बेर्डे यांची ठसकेबाज लावणी; व्हिडीओ व्हायरल

Priya Berde:  “ढोलकीच्या तालावर" (Dholkichya Talavar) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपालून छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी नुकतीच या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया बेर्डे या लावणी सादर करताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

15:48 PM (IST)  •  09 Aug 2023

Priya Bapat: 'रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा माझा निर्णय...'; प्रिया बापटनं शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

Priya Bapat:  मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्रियानं रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. प्रिया आणि उमेश कामत यांचे ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटाकच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच प्रियानं एक खास व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नाटकाची रिहर्सल करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

13:19 PM (IST)  •  09 Aug 2023

Siddique Death: दिग्दर्शक सिद्दीक यांनी वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटाचे केले होते दिग्दर्शन

Siddique Death: प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दीक (Siddique) यांनी वयाच्या 63 या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानं साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिद्दीकी यांनी काल (8 ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunchacko Boban (@kunchacks)

12:19 PM (IST)  •  09 Aug 2023

Don 3 First Look: '11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे...'; डॉन-3 चा टीझर रिलीज, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

Don 3 First Look: डॉन या चित्रपटाच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी रुपेरी पडद्यावर डॉनची भूमिका साकारली.  आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. डॉन आणि डॉन 2 चे दिग्दर्शन करणाऱ्या फरहान अख्तरने डॉन 3 चित्रपटाचा टीझर रिलीज नुकताच शेअर केला आहे. या टीझरमध्ये रणवीर हा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

11:27 AM (IST)  •  09 Aug 2023

Pushpa 2 New Poster: फहाद फासिलच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गिफ्ट; 'पुष्पा-2' चं नवं पोस्टर रिलीज

Pushpa 2 New Poster:    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा चित्रपटाच्या टीमनं चाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे. नुकताच सोशल मीडियावर पुष्पा-2 या चित्रपटातील  भंवर सिंह शेखावत या भूमिकेच्या लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे.  भंवर सिंह शेखावत ही भूमिका  फहाद फासिल हा साकारतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget