Google Mid Year Search 2022 List : आलिया भट ते कतरिना कैफ; गुगल सर्चवर बॉलिवूड कलाकरांचा दबदबा
Google Mid Year Search 2022 List : 10 कलाकरांपैकी बॉलिवूडमधील 6 कलाकारांच्या नावाचा समावेश या यादीत आहे.
Google Mid Year Search 2022 List : गुगलनं (Google) गेल्या सहा महिन्यामध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आलेल्या आशियामधील सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. 2022 या वर्षातील सहा महिन्यांत सर्वात जास्त गुगलवर सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रिटींमध्ये प्रथम क्रमांकावर हा साऊथ कोरियन म्युझिक बँड बीटीएसमधील एका कालाकार आहे. तर टॉप 10 कलाकरांपैकी बॉलिवूडमधील 6 कलाकारांच्या नावाचा समावेश या यादीत आहे. गेल्या सहा महिन्यात गुगलवर सर्वात जास्त ज्यांच्याबद्दल सर्च करण्यात आलं अशा सेलिब्रिटींची नावे पाहूयात......
'V' उर्फ ताए-ह्युंग
वर्ल्ड वाइड मिड ईयर 2022 या यादीमध्ये प्रथम स्थान हे बीटीएस या कोरियन म्युझिक बँडचा सदस्य असणाऱ्या 'V' उर्फ ते-ह्युंग देण्यात आलं आहे. ते-ह्युंग हा 2022 या वर्षातील सहा महिन्यांमध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेला सेलिब्रिटी आहे.
जंगकूक
गुगलनं जाहीर केलेल्या या यादीमध्ये जंगकूकचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. जंगकूक हा बीटीएस या म्युझिक बँडचा सदस्य आहे.
सिद्धू मुसेवाला
पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला या वर्ल्ड वाइड मिड ईयर 2022 च्या सर्च लिस्टमध्ये तीसऱ्या क्रमांकावर आहे. 29 मे 2022 रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली.
पार्क जिमिन
दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध गायक आणि डान्सर तसेच बीटीएस ग्रुपचा मेंबर पार्क जिमिन हा गुगलच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
लता मंगेशकर
गेल्या सहा महिन्यात आशियातील सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रीटींच्या यादीमध्ये लता मंगेशकर यांचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं बॉलिवूडमध्येच नाही तर देशभरात शोककळा पसरली.
लिसा
थायलंडमधील प्रसिद्ध गायिका लिजाचं नाव देखील गुगलच्या या यादीमध्ये आहे. लिसाचं नाव लिसा मॅनोबल असं आहे.
कतरिना कैफ
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफनं गेल्या सहा महिन्यात आशियातील सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रीटींच्या यादीत सातव्या स्थान मिळलं आहे.
आलिया भट
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचं नाव देखील या यादीत आहे. आलियानं 14 एप्रिल रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली त्यानंतर तिनं चाहत्यांना गूड-न्यूज दिली. लवकरच आलिया आणि रणबीर हे आई-बाबा होणार आहेत.
प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. ती सध्या ग्लोबल स्टार आहे. त्यामुळे प्रियांकाचे नाव या यादीमघ्ये आठव्या स्थानावर आहे.
विराट कोहली
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीचं नाव या यादीमध्ये दहाव्या स्थानावर आहे.
2022 या वर्षातील सहा महिन्यामध्ये सर्वात जास्त वेळा गुगलवर सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रिटींच्या यादीमधील टॉप 100 मध्ये अभिनेत्री उर्फी जावेद, क्रिती सेनन, कियारा आडवाणी या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.
हेही वाचा: