एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates टीव्ही ते बॉलिवूड मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates टीव्ही ते बॉलिवूड मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Champaran Mutton: ‘चंपारण मटण’ शॉर्ट फिल्म स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या उपांत्य फेरीत; अभिनेत्री फलक खाननं व्यक्त केल्या भावना

Champaran Mutton:  'चंपारण मटण' (Champaran Mutton) या शॉर्ट फिल्मने स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या (Student Academy Awards) उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.  स्टुडंट अकादमी पुरस्काराला विद्यार्थांचा ऑस्कर देखील म्हटलं जातं. पुण्यातील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधील प्रतिभावान चित्रपट निर्माते रंजन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट स्टुडंट अकादमी पुरस्काराच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. जाणून घेऊयात 'चंपारण मटण' या शॉर्ट फिल्मबद्दल...

Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने  ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण

Jaya Prada Jail : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. चेन्नई मधील रायपेटमध्ये जया प्रदा यांचे स्वत:च्या मालकीचे थिएटर आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या चित्रपटगृहात काम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Gadar 2 Leaked Online : 'गदर 2' रिलीज होताच ऑनलाइन लीक; सनी देओलसह निर्मात्यांना बसला मोठा धक्का

Gadar 2 Leaked Online : अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सनीचे चाहते काही दिवसांपासून या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 'गदर 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असला तरी रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.

18:04 PM (IST)  •  12 Aug 2023

Gadar 2 screening: गदर-2 च्या स्पेशल स्क्रीनिंगला नाना पाटेकर यांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल

Gadar 2 screening: 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट काल (11 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. शुक्रवारी 'गदर 2' प्रदर्शित होताच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईत (Mumbai) या चित्रपटाच्या भव्य स्क्रीनिंग आयोजित केले होते. या  स्क्रीनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 'गदर 2' चित्रपटाच्या या स्पेशल स्क्रीनिंगला अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. नुकताच नाना पाटेकर  (Nana Patekar) यांचा रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर हे सनी देओलला मिठी मारताना दिसत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

14:00 PM (IST)  •  12 Aug 2023

Happy Birthday Sara Ali Khan : आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; सारा अली खान आज आहे कोट्यवधींची मालकीण

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूडमध्ये काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. स्टार किड्ससाठी हा मार्ग तुलनेनं सोपा असतो. हिंदी सिनेसृष्टीतील अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध करणं हे खूप आव्हानात्मक असतं. पण बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सर्वांना वेड लावलं आहे. आज साराचा वाढदिवस आहे. 

Happy Birthday Sara Ali Khan : आलिशान घरं, महागड्या गाड्या अन्…; सारा अली खान आज आहे कोट्यवधींची मालकीण

12:52 PM (IST)  •  12 Aug 2023

Kirkol Navre : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका शोधतेय 'किरकोळ नवरे'; नेमकं प्रकरण काय?

Kirkol Navre New Marathi Drama : सिनेसृष्टीसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटक येत आहेत. छोटा किंवा मोठा पडदा गाजवल्यानंतर सेलिब्रिटी मंडळी आता रंगभूमीवर पदार्पण करू लागले आहेत. आता आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ  नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर रंगभूमीवर आलेलं 'किरकोळ नवरे' (Kirkol Navre) हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल.

Kirkol Navre : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका शोधतेय 'किरकोळ नवरे'; नेमकं प्रकरण काय?

12:26 PM (IST)  •  12 Aug 2023

Suhana Khan: किंग खानच्या लेकीचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, 'वडिलांचे संस्कार'

Suhana Khan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सुहाना (Suhana Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा आर्चिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सुहाना  ही तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.  सुहानाच्या एका व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

12:07 PM (IST)  •  12 Aug 2023

Independence Day 2023 : 'बॉर्डर' ते 'Gadar 2'; यंदाच्या स्वातंत्र्य दिनी देशभक्तीवरचे 'हे' 10 सिनेमे नक्की पाहा

Independence Day 2023 Movies : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले (Independence Day 2023) असून यंदा देशात 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्येही देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'शेरशाह' ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हे सिनेमे नक्की पाहा...

Independence Day 2023 : 'बॉर्डर' ते 'Gadar 2'; यंदाच्या स्वातंत्र्य दिनी देशभक्तीवरचे 'हे' 10 सिनेमे नक्की पाहा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget