एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Maharashtrachi Hasyajatra : आता वीकेंड होणार हसरा... शनिवार आणि रविवार घराघरांत भरणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता वीकेंड हसरा होणार आहे. शनिवार आणि रविवार घराघरांत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' भरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि या जत्रेतून भेटणारी कोहली फॅमिली.. लॉली.. सावत्या.. गौऱ्या आणि असे बरेच प्रतिभावंत कल्लाकार आज आपल्याही घरातील एक सदस्यच झाले आहेत. या साऱ्या अजबगजब पात्रांची आपल्याला इतकी सवय झालेली आहे ना की, एक जरी भाग चुकला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. 

Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने रचला इतिहास; जगभरात 1103.6 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा

Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Record : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतरही जगभरातील सिनेरसिकांमध्ये आणि शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे.  आता पुन्हा एकदा जगभरात 1103.6 कोटींची कमाई करत या सिनेमाने इतिहास रचला आहे. 

Hardeek Joshi : राणादा म्हणतोय,"खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते"; नेमकं प्रकरण काय?

Hardeek Joshi Movie Club 52 : अभिनेता हार्दिक जोशीला (Hardeek Joshi) यंदा त्याच्या वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाचं टायटल  पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  लाँच करण्यात आले होते . आता 'क्लब 52' या सिनेमातील हार्दिकचा लूक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. 

18:24 PM (IST)  •  09 Oct 2023

Raj Kundra: राज कुंद्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण; "UT 69" ची केली घोषणा, चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Raj kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होता. राज हा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन राज कुंद्रानं त्याच्या UT 69 या चित्रपटाची घोषणा केली आहे. राजनं हा व्हिडीओ शेअर करुन UT 69 या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

18:11 PM (IST)  •  09 Oct 2023

Ganapath trailer Out: "एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो..."; बिग बी, टायगर अन् कृतीच्या 'गणपत' चा दमदार ट्रेलर रिलीज

Ganapath trailer Out: अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff)  'गणपत: अ हिरो इज बॉर्न' (Ganapath) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन (Kriti Sanon) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गणपत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अॅक्शन मोडमध्ये  दिसत आहेत. तर बिग बी यांच्या ट्रेलरमधील लूक्स आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

 

15:36 PM (IST)  •  09 Oct 2023

Salman Khan: सलमान खाननं शेअर केलेल्या फोटोमधील 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? उत्तर मिळालं

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानने (Salman Khan)  काल (8 ऑक्टोबर) एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. कारण सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली. सलमाननं शेअर केलेल्या फोटोमधील मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. सलमान लग्न करणार आहे का? अशी चर्चा देखील सोशल मीडियावर होऊ लागली. आता सलमाननं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन मिस्ट्री गर्लचा चेहरा रिव्हिल केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

10:22 AM (IST)  •  09 Oct 2023

Ameya Khopkar : मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? 'आत्मपॅम्फ्लेट' पाहिल्यानंतर मनसे नेते अमेय खोपकर यांचा सवाल

Ameya Khopkar : 'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनीही हा सिनेमा पाहिला आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. चांगल्या सिनेमाला प्रेक्षक जात नसल्याने मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. 

10:21 AM (IST)  •  09 Oct 2023

Urfi Javed : उर्फी जावेदचा नवा लूक पाहिलात का? रस्त्यात पडलेल्या सिगारेटच्या तुकड्यांचा वापर करत बनवलाय ड्रेस

Urfi Javed New Look : आपल्या हटके फॅशन आणि भन्नाट ड्रेसिंगमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच चर्चेत असते. आता तिने रस्त्यात पडलेल्या सिगारेटच्या थोटक्यांचा वापर करून हटके ड्रेस बनवला आहे. उर्फी जावेदचा हा लूक (Urfi Javed New Look) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

VIDEO |  100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 January 2025Suresh Dhas on Santosh Deshmukh | संतोष देशमुखांच्या हत्येचा कट मे महिन्यात शिजला, सुरेश धसांचा दावाBangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
Embed widget