VIDEO | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha
संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला होता, सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत गंभीर आरोप, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा असा मुख्यमंत्र्यांना सल्ला..
पुण्यात सरपंच हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा जन आक्रोश मोर्चाचा सभेत समारोप.., पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह रोहित पवार सहभागी
लोकप्रिय सरपंचाची हत्या झालीय,आम्हाला नीट तपास करु द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधक आणि मोर्चेकऱ्यांना आवाहन..
पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळाल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा आरोप...कराडला नमस्कार करणारे अधिकारी चौकशी करणार का?, दमानियांचा सवाल...
शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तात्पुरता बिघाड, दोन वेळा उडता उडता हेलिकॉप्टर खाली आले..जयंत पाटीलही होते पवारांसोबत हेलिकॉप्टरमध्ये.. ..
अकोल्याच्या अशोक वाटिका चौकात तीन वाहनांचा विचित्र अपघात. कंटेनर, कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या, दोन जण गंभीर जखमी...
मतं दिलात,म्हणजे माझे मालक झाला नाहीत' अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना सुनावलं, परदेश दौऱ्याहून परत येताच पुणे जिल्ह्याचा झंझावाती दौरा..
घोषणेला तीन महिने झाले, पण मराठीला अभिजात दर्जा देणारा सरकारी आदेशच नाही, भालचंद्र जोशींकडून पोलखोल, संजय राऊतांचीही टीका, मुख्यमंत्री म्हणतात विरोधक माहिती न घेता बोलतात....
शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झाले, माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान..देशभरातून लोक येऊन फुकट जेवतात अशी मुक्ताफळं...
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली...महिला सरकारवर नाराज होतील, जयंत पाटलांची प्रतिक्रिया...तर काम झालं म्हणून बहिणींचे पैसे परत घेतायेत, संजय राऊतांचा हल्लाबोल...
दिल्लीतल्या मेट्रोच्या चौथ्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, भारतात आता मेट्रोचं १ हजार किलोमीटरचं जाळं, जगातला तिसरा मोठा देश बनण्याचा भारताला मान..
पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात, तिघांचा मृत्यु, कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरमधून निघाले धुराचे लोट..
भारतानं १० वर्षानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली, सिडनीच्या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलिया ६ विकेट्सनी विजयी... मालिका गमावल्यानंतर सिनियर खेळाडूंवर चहूबाजूंनी टीका