Aatmapamphlet : अतरंगी, तिरकस, विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर आऊट
Aatmapamphlet Trailer : 'आत्मपॅम्फ्लेट' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Aatmapamphlet Trailer Out : अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे.
'आत्मपॅम्फ्लेट'चं कथानक काय आहे? (Aatmapamphlet Movie Story)
एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र 'आत्मपॅम्फ्लेट' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे 'आत्मपॅम्फ्लेट' येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या सिनेमाचे लेखन 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी' आणि 'वाळवी' यांसारख्या भन्नाट सिनेमे देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. त्यामुळे 'आत्मपॅम्फ्लेट'मध्येही प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात 'आत्मपॅम्फ्लेट'चा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला.
'आत्मपॅम्फ्लेट'बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात,"आत्मचरित्र थोरामोठ्यांचीच असतात असा सर्वसाधारण नियम आहे, पण अत्यंत सामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असूच शकतं, आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं हेच 'आत्मपॅम्फ्लेट' मधून मांडण्यात आले आहे. कोवळ्या वयातील ही वरकरणी एक प्रेमकथा वाटेल पण नक्कीच हा सिनेमा त्याहूनही बरच काही सांगण्याचा प्रयत्न करतो. यातील प्रत्येक पात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे आहे. प्रत्येकाला ही स्वतःचीच गोष्ट वाटेल. आपल्या आवडत्या काळाचा नॉस्टॅलजिया देणारा आणि प्रत्येक वयोगटासाठीचा हा चित्रपट असेल. नावावरूनच काहीतरी हटके असणारा हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे".
आतापर्यंत 'आत्मपॅम्फ्लेट'चा बर्लिन आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड बरोबरच टिफ ज्युनिअर, 63वा झ्लीन फिल्म फेस्टिवल ऑफ चेक रिपब्लिक, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, आयएफएफएसए टोरोंटो असा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास झाला आहे. 'आत्मपॅम्फ्लेट' या आगळ्या-वेगळ्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राईडसारखी, तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. सर्व वयोगटासाठी हा चित्रपट आहे.
संबंधित बातम्या