Bangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपये
भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचं रेट कार्ड माझाच्या हाती
भारतात येण्यासाठी बांगालादेशींना दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रुपये
जमिनीच्या मार्गे येण्यासाठी द्यावे लागतात ७ ते ८ हजार रुपये
समुद्रमार्गे भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात २ ते ४ हजार रुपये
१९९४ पासून चर्नी रोड भागात राहणाऱ्या बांगलादेशींना अटक
हे देखील वाचा
Suresh Dhas: अजितदादा डोळे उघडून खाली बघा काय सुरू आहे, बारामतीमधील तुमचा विश्वासू बीडला पाठवा, सत्य समोर येईल; सुरेश धसांचा हल्लाबोल सुरुच
बीड: बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात केली, या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक करत अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे, अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत, अजित पवारांचं धनंजय मुंडे जवळ काय अडकलं आहे, असा सवाल त्यांनी भर सभेमध्ये उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केलीय.
अजितदादा तुझ्या पाया पडतो...!
माझी आत्ताच विनंती आहे. पुणे जिथे काय होणे, अशा ऐतिहासिक शहरांमधून मी मागणी करतोय. मायबाप सरकारने, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, अजितदादा यांना विनंती करतो, त्याला मंत्रीमंडळात ठेवू नये. अजितदादा फार प्रांजळ मनाचा माणूस आहे. पाच वर्षाच्या लेकरासारखं अजित दादाचा हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालत नाही. मी त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे मला माहिती आहे. मी काही लोकांना घेऊन गेलतो. त्यांना म्हटलं यांच्या बाबतीत फोन करा. अजितदादा तेव्हा मला म्हणाले हे चुकीचे वागणारे लोक आहेत. मी यांच्या चुकीच्या बाबतीत फोन करणार नाही. एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर तब्बल दहा वेळा हे माझ्या बाबतीत घडलं आहे. मी राष्ट्रवादी 2005 पासून 2017 पर्यंत होतो, जवळजवळ दहा-बारा वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. त्यांच्याबरोबर मी काम केलं. अजितदादा असा नव्हता. अजितदादा मी तुमच्या पाया पडतो, तुझं काय अडकले रे यांच्यापाशी असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे