एलिझाबेथ एकादशीमधील गोंडस चिमुकला आता झालाय 23 वर्षांचा, अभिनयापासून दूर; कोणत्या क्षेत्रात काम करतोय?
Elizabeth Ekadashi Movie Fame Actor Shrirang Mahajan : एलिझाबेथ एकादशीमधील गोंडस चिमुकला आता झालाय 23 वर्षांचा, अभिनयापासून दूर; कोणत्या क्षेत्रात काम करतोय?

Elizabeth Ekadashi Movie Fame Actor Shrirang Mahajan : मराठी चित्रपटसृष्टीत धार्मिक आणि सामाजिक आशयाला हात घालणारे अनेक चित्रपट पाहायला मिळतात. त्यामध्ये ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाचे विशेष महत्त्व आहे. एलिझाबेद एकादशी हा दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा 2014 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात धार्मिक श्रद्धा, बालमनातील निरागसता आणि पंढरपूरच्या वारीचे वातावरण यांची सुंदर पद्धतीने दाखवण्यात आले होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. टीव्हीवर देखील या सिनेमाने मोठी पसंती मिळवली होती. या सिनेमात श्रीरंग महाजन (Shrirang Mahajan) आणि Sayali Bandakavathekar यांनी मुख्य पात्र साकारली होती.
दरम्यान, एलिझाबेथ एकादशी सिनेमात मुख्य पात्र साकारणारा श्रीरंग महाजन महाजन आता 23 वर्षांचा झाला असून अभिनयापासून दूर आहे. Kalakruti Media शी बोलताना श्रीरंग महाजन म्हणाला,मला सिनेमामुळे प्रसिद्धी भरपूर मिळाली. आजही लोकं सिनेमा बघितला तर मॅसेज करतात. सुंदर काम केल्याचं सांगतात. लहान असताना मला हे काय कळत नव्हत. नंतरच्या काळात जाणवू लागलं की, खूप लोक आपल्याला ओळखतात आणि आपण खरंच चांगलं काही तरी केलंय.
पुढे बोलताना श्रीरंग महाजन म्हणाला, अभिनय माझ्या पोटापाण्याचं साधन नसेल हे मी तेव्हाच ठरवलं होतं. अभिनय क्षेत्रातच काम करायचं आहे, असं कधी ठरवलेलं नव्हतं. आपलं पोटापाण्याचं साधन काहीतरी वेगळं असणार आहे, हे मला माहिती होतं. हे घरच्यांनी सांगितलं नव्हतं. मी सायन्स फॅकल्टी निवडली. त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मी पुण्यातून कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर जॉब सुरु केला.
View this post on Instagram
सिनेमाची स्टोरी काय?
चित्रपटाची कथा पंढरपूरच्या पवित्र नगरीभोवती फिरते. सिनेमातील कुटुंब आर्थिक अडचणी सापडल्यामुळे घऱ्यातील अनेक वस्तू विकाव्या लागतात. अशावेळी ‘एलिझाबेथ’ नावाची जुनी सायकल खूप जपायची असते. ती सायकल त्याच्यासाठी केवळ वाहन नसून आठवणींचे प्रतीक असते. आईच्या अडचणीमुळे आणि घरातील गरजांमुळे ती सायकल विकण्याची वेळ येते. इथूनच कथेतली भावनिक संघर्षाची सुरुवात होते. चित्रपटात एकीकडे विठोबावरील श्रद्धा, वारीचे वेगळेपण दाखवले आहे, तर दुसरीकडे दारिद्र्य, सामाजिक वास्तव आणि आई-मुलामधील नात्याचा कोमल भावस्पर्शी पैलूही मांडलेला आहे. सायकल विकण्याची वेळ आल्यानंतर कुटुंबातील चिमुकला मुलगा आणि त्याची बहीण बांगड्याचं दुकान टाकतात. मित्र त्याच्या संकटात सहभागी होतात आणि बालसुलभ मैत्रीचे अप्रतिम चित्र उभे राहते. कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे प्रेक्षकही त्या वातावरणात रंगून जातात. एकूणच, ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट हा केवळ मनोरंजन करणारा नसून समाजाला संदेश देणारा आणि भावनांना हात घालणारा आहे. आई-मुलाचे नाते, वडिलांच्या आठवणींचे मोल आणि श्रद्धा-समर्पण यांचा संगम या चित्रपटात दिसतो. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ठरतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























