![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ekta Kapoor: 'हिचं बाई एक कोडंच आहे!' स्वतःच्याच दिवाळी पार्टीत एकता कपूरची उडाली खिल्ली, असं काय घडलं?
Ekta Kapoor: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये ती स्वत:च अधिक चर्चेत राहिली आहे. या पार्टीतील तिचे व्हिडीओ, फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत.
![Ekta Kapoor: 'हिचं बाई एक कोडंच आहे!' स्वतःच्याच दिवाळी पार्टीत एकता कपूरची उडाली खिल्ली, असं काय घडलं? Ekta Kapoor entertainment diwali 2024 Ekta Kapoor was trolled at her own Diwali party fashion lifestyle marathi news Ekta Kapoor: 'हिचं बाई एक कोडंच आहे!' स्वतःच्याच दिवाळी पार्टीत एकता कपूरची उडाली खिल्ली, असं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/29/1d4558e63e902591448e267850ffa6161730176434475381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ekta Kapoor : बी टाऊनमध्ये (B-Town Diwali Bash 2024) दिवाळी सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. अशात काही दिवसांपूर्वी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी ग्रँड दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बी टाऊन सेलेब्सची गर्दी पाहायला मिळाली. मनीष मल्होत्रा, चित्रपट निर्माते रमेश तौरानी नंतर आता एकता कपूरच्या (Ekta Kapoor) दिवाळी बॅशमध्ये सेलेब्स त्यांच्या जबरदस्त फॅशन लुक्समध्ये दिसले. यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की, एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये ती स्वत:च अधिक चर्चेत राहिली आहे. या पार्टीतले तिचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ समोर येत आहेत. यावर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. काय घडलं नेमकं? जाणून घेऊया..
एकता कपूर स्वत:च्याच दिवाळी पार्टीत झाली ट्रोल!
मनीष मल्होत्रा, रमेश तौरानी यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केल्यानंतर आता टॉलिवूड क्वीन एकता कपूरनेही दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील एकता कपूरचे अनेक व्हिज्युअलही व्हायरल झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी ती सार्वजनिक ठिकाणी दिसली. ज्यामध्ये टेलिव्हिजन सेलिब्रिटींपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मालिकेच्या दुनियेतील आवडती सून हिना खान, अनिता हसनंदानी, दिव्यांका त्रिपाठी, माहिरा शर्मा, श्रद्धा आर्या, अवनीत कौर, राशी खन्ना, नुसरत भरुचा, मृणाल ठाकूर, विक्रांत मॅसी, वामिका गब्बी यांच्यासह अनेक स्टार्स येथे दिसले. अशावेळी अनेक सेलेब्सच्या एंट्रीने प्रसिद्धी मिळवली.
View this post on Instagram
ड्रेसिंग सेन्सची उडवली खिल्ली
एकताचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये एकताबरोबर करण सिंह ग्रोव्हर दिसून येत आहे. यावेळी एकता करणला मिठी मारताना दिसून येत आहे. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत स्वतः एकता करत असलेली दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झालेत. सोशल मीडियावर एकताला पाहून अनेक यूजर्स हैराण झाले. एक यूजर म्हणतो की, एकता पूर्णपणे अनोळखी दिसत आहे. काही युजर्सनी चित्रपट निर्मात्याला त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ट्रोल देखील केले आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा
टॉलिवूड क्वीन एकताच्या ग्रँड दिवाळी पार्टीमध्ये अनेक दिग्गज कलकार उपस्थित होते. मात्र या सगळ्यात एकता कपूर इतरांपेक्षा अधिक चर्चेत राहिली. एकताचे व्हिडीओ देखील समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी तर यावर भरभरून कमेंट्सही दिल्याचं पाहायला मिळत आहे
एकता कपूर आणखी एका गोष्टीमुळे अडचणीत
टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर सध्या आणखी एका गोष्टीमुळे अडचणीत आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एकता आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. एकता कपूरने तिचे अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. तिच्या निवेदनात तिने सर्व आरोप फेटाळून लावले आणि कायद्याला पूर्ण सहकार्य करत असल्याचेही सांगितले.
हेही वाचा>>>
Alt Balaji: अल्ट बालाजीची 'गंदी बात' , अल्पवयीन मुलींची अश्लील दृश्य, गुन्हा दाखल, एकता कपूर अडचणीत!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)