मोठी बातमी : अभिनेता डिनो मोरियाच्या घरी 11 तासांपासून ईडीची छापेमारी
ED raid on actor Dino Morea house : मोठी बातमी : अभिनेता डिनो मोरियाच्या घरी 11 तासांपासून ईडीची छापेमारी

ED raid on actor Dino Morea house : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया सध्या त्यांचा नवीन मल्टीस्टारर चित्रपट 'हाऊसफुल 5' मुळे चर्चेत आहेत. मात्र, त्याचा सिनेमा रिलीज झालेला असतानाच डिनो मोरियाची मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु होती. मात्र, आता या प्रकरणात ईडीने एन्ट्री घेतली आहे. (ED raid on actor Dino Morea house) डिनो मोरियाची गेल्या 11 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. ED ने मुंबई आणि केरळसह एकूण 15 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया, BMC चे सहायक अभियंता प्रशांत रामुगाडे, तसेच काही कंत्राटदारांचे निवासस्थान यांचा समावेश होता. (ED raid on actor Dino Morea house)
डिनो मोरिया यांची EOW द्वारे आधीच दोन वेळा चौकशी
शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या डिनो मोरिया यांची यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दोन वेळा चौकशी केली होती. आता ED छाप्यादरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या आर्थिक कागदपत्रे आणि इतर पुरावे तपासत आहे, जेणेकरून हा घोटाळ्यात कोण सामील आहे हे समोर यावे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत करण्यात आली आहे. (ED raid on actor Dino Morea house)
मीठी नदी घोटाळा : बीएमसी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा
EOW ने यापूर्वीच BMC अधिकारी आणि कंत्राटदारांसह एकूण 13 जणांविरोधात मीठी नदी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ED चा संशय आहे की, विशेष ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेण्यासाठी टेंडर प्रक्रियेत छेडछाड करण्यात आली, आणि ठराविक पुरवठादारांना फायदा मिळवून देण्यात आला. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. मीठी नदी, जी मुंबईतून वाहून अरबी समुद्रात मिळते, ही नदी सतत गाळ आणि पुराच्या समस्यांमुळे त्रस्त आहे.(ED raid on actor Dino Morea house)
अक्षय कुमारच्या 'हाउसफुल 5' चित्रपटात काम करणारा अभिनेता डिनो मोरिया सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. डिनो मोरियाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्याचदरम्यान त्याला ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. (ED raid on actor Dino Morea house)
डिनोचा पहिला चित्रपट काही विशेष चालला नाही. त्यानंतर तो 2002 साली बिपाशा बासूसोबत 'राज' या चित्रपटात झळकला. या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. मात्र, या यशानंतरही डिनो मोरियाचा अभिनय क्षेत्रातील करिअर स्थिरावू शकला नाही. यानंतर तो अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये दिसला. त्यामुळेच त्याने अभिनयापासून काहीसा ब्रेक घेतला. बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर, डिनो मोरियाने 2021 साली ‘द एम्पायर’ या वेब सिरीजमधून दमदार पुनरागमन केले. आता तो अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘हाउसफुल 5’ मध्ये दिसणार आहे. (ED raid on actor Dino Morea house)
इतर महत्त्वाच्या बातम्या

















