Disha Patani : टायगर श्रॉफच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला दिशा पाटनीची ‘हिरोपंती’, नेटकऱ्यांनी ‘या’मुळे केलं ट्रोल!
Heropanti 2 : टायगरच्या फिल्म स्क्रिनिंगसाठी दिशा पाटनीने प्लंगिंग नेकलाईनसह लेव्हेंडर रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
Heropanti 2 : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याचा 'हिरोपंती 2' (Heropanti 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शनापूर्वी, इतर चित्रपटांप्रमाणे, या चित्रपटासाठीही सेलिब्रिटी स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स एकत्र दिसले. या खास शोसाठी कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर पोशाख निवडले होते. पण, या सगळ्यात टायगरची खास मैत्रीण दिशा पाटनीची (Disha Patani) उपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सुंदर ड्रेसमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री एका गोष्टीमुळे ट्रोल देखील होत आहे.
टायगरच्या फिल्म स्क्रिनिंगसाठी दिशा पाटनीने प्लंगिंग नेकलाईनसह लेव्हेंडर रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. दिशा नेहमीप्रमाणे या आऊटफिटमध्ये खूपच हॉट आणि सिझलिंग दिसत होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिशा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी फोटोग्राफर्ससाठी पोज देताना दिसत आहे. मोकळे केस, मॅचिंग स्टडसह ग्लॅम मेकअप आणि हातात एक छोटी हँड बॅग घेऊन दिशा ‘हिरोपंती 2’च्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. यादरम्यान दिशाच्या हँडबॅगने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
पाहा व्हिडिओ :
काही लोकांनी अभिनेत्रीच्या फॅशनचे कौतुक केले. तर, काहींनी तिच्या बॅगची खिल्ली उडवली. या बॅगमुळेच दिशा खूप ट्रोल देखील होत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'या छोट्याशा पर्समध्ये नेमकं काय आहे?' तर, दुसर्याने लिहिले, 'एवढ्या छोट्या पर्समध्ये पान मसाला पाऊच आहे काय?'. काही लोकांचे लक्ष दिशाच्या लूकवर होते. दिशा पाटनीच्या ओठांकडे पाहताना नेटिझन्सनी अंदाज बांधलाय की, अभिनेत्रीने नुकतीच लीप सर्जरी करून घेतली असावी.
हेही वाचा :