एक्स्प्लोर

Happy Birthday Dipika Chikhalia : ‘माता सीता’च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचल्या, आता राजकारणातही सक्रिय झाल्या दीपिका चिखलिया!

Dipika Chikhalia birthday : ‘रामायण’ या मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhalia) यांनी ‘माता सीता’ची भूमिका साकारली होती.

Dipika Chikhalia birthday : एक काळ असा होता, जेव्हा टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या ‘रामायण’ (Ramayana) या मालिकेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना लोक चक्क देव मानू लागले होते. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhalia) यांनी ‘माता सीता’ची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय इतका सशक्त होता की, खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना देवी मानू लागले होते. याच प्रतिमेमुळे घरांघरात पोहोचलेल्या दीपिका चिखलिया यांचा आज वाढदिवस आहे.

29 एप्रिल 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या दीपिका यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. दीपिका यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी व्यावसायिक जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. रामानंद सागर यांच्या रामायणात सीतेची भूमिका साकारून दीपिका यांना लोकप्रियता मिळाली की, त्यांची देवीच्या रूपात पूजा केली जाऊ लागली. याच प्रतिमेचा फायदा घेण्यसाठी त्यांना राजकीय ऑफर्सही मिळू लागल्या होत्या.

‘सीता’ ही ओळख कायमस्वरूपी!

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी ‘रामायणा’च्या आधी आणि नंतरही अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. मात्र, या मालिकेमधून त्यांना जे यश मिळालं, ते इतर कोणत्याही व्यक्तिरेखेमुळे मिळालेलं नाही. 1983मध्ये ‘सुन मेरी लैला’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं होतं. या चित्रपटात दीपिका यांच्यासोबत अभिनेते राज किरण  झळकले होते. राजेश खन्ना यांच्यासोबत ‘रुपये दस करोड़', 'घर का चिराग' आणि 'खुदाई' यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या होत्या.

हिंदीच नव्हे, तर दीपिका यांनी काही साऊथ चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. सीतेच्या भूमिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर दीपिका चिखलिया यांनी राजकारणातही भाग घेतला आणि त्या खासदार झाल्या. दीपिका चिखलिया भारतीय जनता पक्षाच्या वतीने 1991मध्ये गुजरातच्या बडोदा मतदारसंघातून लोकसभेच्या सदस्य झाल्या होत्या. आजही त्या राजकारणात सक्रिय आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget