Director Reacts On Priyanka Chopra Akshay Kumars Affair: 'विवाहित पुरूषांनी जरा जास्तच...'; अक्षय कुमार, प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या चर्चांवर काय म्हणाला दिग्गज दिग्दर्शक?
Director Reacts On Priyanka Chopra Akshay Kumars Affair: खरंच, अक्षय कुमार, प्रियांका चोप्राचं अफेअर होतं का? दिग्गज दिग्दर्शकानं केलाय खळबळजनक खुलासा

Director Reacts On Priyanka Chopra Akshay Kumars Affair: बॉलिवूडच्या (Bollywood) सुपरहिट ऑनस्क्रिन जोड्यांपैकी एक म्हणजे, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra). या जोडीनं अनेक हिट सिनेमे दिले. 'मुझसे शादी करोगी' (Mujhse Shaadi Karogi), 'ऐतराज' (Aitraaz), 'अंदाज' (Andaaz), 'वक्त' यांसारख्या सिनेमांमध्ये अक्षय, प्रियांकाची धम्माल केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळाली. त्यानंतर काही काळातच अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. त्यावेळी अक्षय कुमारचं ट्विंकल खन्नाशी लग्न झालं होतं. पण, तरीसुद्धा अक्षय आणि प्रियांकाचं सूत जुळल्याच्या चर्चांनी जोर धरलेला. खरंच दोघांचं अफेअर होतं का? यावर बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकानं मौन सोडलं आहे.
बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक सुनील दर्शन (Sunil Darshan) यांनी नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. त्यापैकी एक विषय म्हणजे, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं अफेअर...
चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी यापूर्वीही अनेकदा प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. अशातच आता ते पुन्हा एकदा 'अंदाज 2' हा चित्रपट घेऊन येत आहेत. यासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'बरसात' चित्रपटाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं की, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्यासोबत एक गाणं चित्रित करण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रॉब्लेम्समध्ये अक्षय कुमारला ते गाणं काढून टाकावं लागलं.
पुरूषांची सवयच असते चुका करण्याची... : सुनील दर्शन
सुनील दर्शन यांनी बॉलीवूड बबलशी बोलताना सांगितलं की, "बरसात' सिनेमाची शुटिंग सुरू केलेली. त्यांनी प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारसोबत एक गाणं देखील चित्रित केलं होतं, पण त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले. त्यावेळी अक्षयनं सांगितलेलं की, काही पर्सनल इश्यू आहेत, त्यामुळे हा चित्रपट तो (अक्षय) किंवा प्रियांका यांच्यापैकी एकासोबतच होऊ शकतो का? मला असं वाटतं की, सर्व अभिनेत्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, विवाहित पुरूषांनी जास्त खबरदारी घेणं गरजेचं असतं, पण पुरूषांची सवयच असते चुका करण्याची... त्याच्या चुकीची शिक्षा निर्मात्यांनी मिळाली, त्यांना नुकसान सहन करावं लागलं. मला त्या सर्व प्रकाराची जबाबदारी प्रियांकावर अजिबात टाकायची नाहीय... अक्षयनंच हा पर्याय सुचवला होता, त्यात तो जवळचा होता, त्यामुळे त्याच्याशिवाय सिनेमे करण्याचा निर्णय घेण्यात आला..."
अक्षय कुमारसोबत बोलणं होत नाही : सुनील दर्शन
मुलाखतीदरम्यान बोलताना दिग्दर्शक सुनील दर्शन म्हणाले की, कधीकाळी अक्षय कुमारनं त्यांना 100 चित्रपट करण्याचं आश्वासन दिलं होतं. 6-7 चित्रपट केल्यानंतर त्याला त्याच्यात बदल दिसू लागले. सुनील दर्शन यांनी पुढे बोलताना सांगितलं की, ही गोष्ट 2005 च्या सुमारास घडली. 20 वर्ष उलटून गेली आहेत आणि मी अजूनही अक्षय कुमारच्या संपर्कात नाही. कधीकधी अक्षय वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो... सुनील दर्शननं यापूर्वी सांगितलं आहे की, जेव्हा अक्षय आणि प्रियांकाच्या अफेअरची बातमी आली, तेव्हा ट्विंकल खन्ना घर सोडून निघून गेली.
सुनील दर्शन यांनी फ्रायडे टॉकीजशी बोलताना म्हटलं होतं की, "काही चुका झाल्या होत्या. प्रियांका आणि अक्षय यांच्याबद्दल अफवा पसरू लागल्या होत्या आणि ट्विंकल खन्ना घर सोडून निघून गेली होती. एक अभिनेता म्हणून, तुम्ही जबाबदार असलं पाहिजे. जर तुमची पत्नी अभिनेत्री असेल आणि तिला इंडस्ट्रीबद्दल सर्व काही माहीत असेल आणि तिनं इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्ससोबत काम केलं असेल. तर तिला सर्व काही माहीत असतं... मी यासाठी प्रियांका चोप्राला दोष देत नाही. ती फक्त तिच्या हिताचं काम करत होती..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























