एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आयएमडीबीवर दिल बेचाराचा विक्रम, चाहत्यांनी दिलं 9.8 रेटिंग

डिस्ने हॉटस्टारवर सुशांतसिंग राजपूतचा दिल बेचारा रिलीज झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या.आयएमडीबी या विश्वासार्ह पोर्टलवर चाहत्यांच्या या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि या सिनेमाला सायंकाळपर्यंत रेटिंग मिळालं चक्क 9.8.

मुंबई : सुशांतसिंग राजपूतची शेवटची फिल्म म्हणून दिल बेचाराकडे पाहिलं गेलं. त्याने केलेली आत्महत्या. त्यानंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेले वाद यामुळे एकूण आउटसायडर आणि त्यांना मिळणारी वागणूक यावर अनेकजण व्यक्त झाले. त्याच पार्श्वभूमीवर दिल बेचारा रिलीज झाला. डिस्ने हॉटस्टार यांनी हा सिनेमा रिलीज केला. संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या. पण हा सिलसिला शनिवारी सकाळपासून आणखी वाढला. आयएमडीबी या विश्वासार्ह पोर्टलवर चाहत्यांच्या या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि या सिनेमाला सायंकाळपर्यंत रेटिंग मिळालं चक्क 9.8. सकाळी हे रेटिंग 10 पैकी 10 वर गेलं होतं. आयएमडीबी ही मनोरंजनाची माहीत देणारी विश्वासार्ह वेबसाईट मानली जाते. 1990 मध्ये ही वेबसाईट बनण्यात आली. चित्रपट, मालिका, कलाकार आदींबद्दल योग्य माहिती.. चाहत्याचे रिव्हयू.. रेटिंग आदीसाठी हे पोर्टल योग्य मानलं जातं. दिल बेचारा रिलीज झाल्यानंतर आयएमडीबीवर या चित्रपटाचे रिव्हयू येऊ लागले. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याला प्रचंड सहानुभूती या सिनेमाद्वारे मिळालेली पाहायला मिळाली. शनिवारी सकाळी आयएमडीबीवर दिल बेचारा या चित्रपटाचं चाहत्यांनी 10 पैकी 10 रेटिंग दिलं होतं. त्यानंतर दिवसभर हा प्रकार चालू होता. काल संध्याकाळी हे रेटिंग 9.8 आलं आहे. हा आयएमडीबीवरचा विक्रम मानला जातो. आजवर कोणत्याही सिनेमाला 10 पैकी 10 रेटिंग मिळालं नव्हतं. सुशांतच्या सिनेमाने ते करून दाखवलं. शुक्रवारी संध्याकाळी चित्रपट आल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद शनिवारी सकाळपासून वाढला. त्याच्या चाहत्यांनी आयएमडीबीवर जाऊन जाऊन प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. त्यामुळे या पोर्टलवर इतका ताण आला की त्याचा सर्वर 40 मिनिटं बंद पडला. त्यानंतर तो पुन्हा सुरू झाला. याबद्दल बोलताना सुशांतच्या दिल बेचारा या चित्रपटाची फॅन सृष्टी देशपांडे म्हणाली, मी सुशातची चाहती आहेच. पण हा सिनेमा मला त्यापलिकडचा वाटला. आण्ही सगळे ग्रुपने आपआपल्या घरी हा सिनेमा पाहिला. पहाटे साडेचार वाजता आम्ही सगळे फ्रेंड एकमेकांशी बोललो. प्रत्येकजण रडत होता. सिनेमाचा विषय आणि सुशांतचं जाणं हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं आहे. म्हणूनच आम्ही आयएमडीबीवर व्होट केलं. सुशांतचा शेवटचा चित्रपट हिट होणार आहेच. सध्या दिल बेचारा या चित्रपटाला आयएमडीबीवर 9.8 रेटिंग असलं तरी ते 10 करण्याकडे हा सिनेमा पाहिलेल्या तरूणाईचा कल आहे. काही लोक या साईटवर सिनेमा तितका चांगला नसल्याचंही म्हणत आहेत. त्या लोकांना ही मंडळी ट्रोलही करताना दिसताहेत. यातून एकच गोष्ट लक्षात येते, सुशांतच्या जाण्याचा धक्का अजून भारतातली तरूणाई पचवू शकलेली नाही. मुकेश छाब्रा दिग्दर्शित हा चित्रपट दोन प्रेमिकांची गोष्ट सांगतो. दुर्धर आजारााने ग्रस्त असलेलं प्रेमी युगुल आणि त्यांचे जगण्याबद्दलचे विचार. मरणाबद्दलची फिलॉसॉफी मांडण्याचा प्रयत्न इथे झाला आहे. द फॉल्ट इन आवर स्टार्स या हॉलिवूडपटावरून हा सिनेमा घेतला आहे. रिव्ह्यू नक्की वाचा - Dil Bechara Movie Review |  हूरहूर..हळहळ आणि वेदना!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरीSunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
Embed widget