Delhi Crime Season 2 : 'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज; शेफाली शाह उलगडणार मर्डर मिस्ट्री?
'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला (Shefali Shah) या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे.
Delhi Crime Season 2 : ओटीटीवरील 'दिल्ली क्राईम' (Delhi Crime) या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला (Shefali Shah) या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. दिल्ली क्राईमचा पहिला सिझन हा दिल्लीमधील चर्चित निर्भया प्रकरणावर आधारित होता. आता या नव्या सिझनमधील मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ट्रेलरमध्ये शेफाली शाह दक्षिण दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील शेफालीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
'दिल्ली क्राईम- 2' ही सीरिज 26 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये पहिल्या सिझनमधील काही कलाकार दिसणार आहेत. रसिका दुग्गल, राजेश तेलांग यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तर या सीरीजचे कथानक मयंक तिवारी, शुभ्रा स्वरूप आणि इंशिया मिर्जा यांनी लिहिली आहे. या सीरिजचे संवाद लेखन विराट बसोया आणि संयुक्था चावला शेख यांनी केलं आहे.
पाहा ट्रेलर:
शेफाली शाहला 'दिल्ली क्राईम' या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या सीरिजमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. शेफालीचा नुकताच 'डार्लिंग्स' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शेफालीसोबतच आलिया भट्टनं देखील काम केलं आहे. या चित्रपटामध्ये शेफालीनं आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे.
वाचा सविस्तर बातमी:
- भारताची Delhi Crime आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वेबसीरिज!
- Entertainment News Live Updates 8 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- Santosh Juvekar : ‘शाहरुख खानच्या ज्या ऑफिसमधून हाकलंल, आज तिथेच माझी वाट पाहिली जातेय!’, अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत!