एक्स्प्लोर

Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले

Share Market Crash: भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या आठवड्यात घसरणीसह बंद झाले. 9 ते 13 मार्च दरम्यान गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण कायम आहे. अमेरिका आणि इराण युद्ध कायम राहणं, कच्चा तेल्याच्या दरात झालेली वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली भारतीय शेअरची विक्री यासह इतर कारणांमुळं भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 घसरणीसह बंद झाले. 

भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स  13 मार्चला 1471 अंकांनी घसरुन  74563.92 अंकांवर आला. तर निफ्टी 50 निर्देशांक 488 अंकांनी घसरुन 23151.10 अंकांवर आला. बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक आणि बीएसई  250 स्मॉलकॅप  निर्देशांक देखील 2.67 टक्क्यांनी घसरला. 

9 ते 13 मार्च या पाच दिवसात सेन्सेक्स 4355 अंकांनी म्हणजेच 5.5 टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी 50 निर्देशांक 5.3 टक्क्यांनी म्हणजेच 1300 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांनी या पाच दिवसांमध्ये तब्बल 20 लाख कोटी रुपये गमावले आहेत. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 450  लाख कोटींवरुन 20 लाख कोटींनी कमी होऊन 430 लाख कोटींवर आलं आहे. 

शेअर बाजारातील घसरणीची कारणं

अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं होतं. हे युद्ध दोन आठवडे झाले तरी संपण्याची शक्यता चिन्हं दिसत नाहीत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा आणि शहीद जवानांच्या मृत्यूचा आणि लहान मुलींच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचं म्हटलंय. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या जहाजांवर हल्ले करणं सुरु आहे याशिवाय आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणकडून हल्ले सुरु आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. 

अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कच्चा तेलाचे दर वाढण्यामध्ये झाला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचले आहेत. यामुळं शेअर बाजारावर परिणाम होत आहे. जो पर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरु  राहील तोपर्यंत कच्चा तेलाच्या दरातील वाढ कायम राहू शकते. 

दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण सुरु आहे. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 92.45 रुपयांवर पोहोचला आहे. 

विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय  शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचं सत्र कायम आहे. मार्च महिन्यात 12 मार्च पर्यंत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 46167 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. जुलै 2025 पासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार विक्री करत आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरभाडे भत्त्याच्या 2% दरवाढीला मंजुरी, महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरभाडे भत्त्याच्या 2% दरवाढीला मंजुरी, महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय तृतीयेच्या सणापूर्वी दिलासादायक बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सविस्तर माहिती
अक्षय तृतीयेच्या सणापूर्वी दिलासादायक बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सविस्तर माहिती
काळजी करण्याचं कारण नाही! देशात LPG आणि कच्च्या तेलाची नेमकी काय स्थिती? सरकारनं दिली महत्वाची माहिती
काळजी करण्याचं कारण नाही! देशात LPG आणि कच्च्या तेलाची नेमकी काय स्थिती? सरकारनं दिली महत्वाची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
Embed widget