Santosh Juvekar : ‘शाहरुख खानच्या ज्या ऑफिसमधून हाकलंल, आज तिथेच माझी वाट पाहिली जातेय!’, अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत!
Santosh Juvekar Post : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर याने ‘डार्लिंग्स’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Santosh Juvekar Post : नुकताच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘डार्लिंग्स’ (Darlings) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा देखील झळकला आहे. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या स्ट्रगलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या ड्रीम्स प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनला आहे.
संतोषने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘डार्लिंग्स’चा ट्रेलर दिसत आहे. सोबतच त्याने एका मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. यात त्याने एकेकाळी शाहरुखच्या ऑफिसखाली झालेल्या आपल्या अपमानाचा किस्सा शेअर केला आहे. संतोषची ही पोस्ट वाचून आता चाहतेही त्याला कौतुकाची थाप देत आहेत
काय म्हणाला संतोष जुवेकर?
अभिनेता संतोष जुवेकर याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘वर्ष-1998. ठिकाण - दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला production office)
मी ऑफिसच्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का, कुणाला भेटता येईल का म्हणुन गेटवर जाऊन विचारतो एका सिक्युरिटी गार्डला, तर तो मला ओरडून “चलो निकलो इधरसे चलो उधर खडे रहो, किसीने बुलाया होगा तोही अनेका. चलो निकलो........” आणि मी थोडासा नाराज होऊन, पण थोडासा चिडून त्याला बोलतो “रुक तू.......एकदिन तुमलोगही गेट खोलेगा मेरे लिये” असं बोलून त्या बिल्डींगजवळ थोड्यावेळ उभं राहून मी निघून जातो.
पण, मनात आणि डोक्यात एक स्वप्नं आणि तो अपमान कायम उराशी बाळगलेला. मग, काही वर्षांनतर मला एक कॉल येतो, “hi santosh sir m calling from redchillis entertainment can we meet? We want to cast u for our next film, if possible plz come to the office.”
वर्ष- 2020
ठिकाण - खार-सांताक्रूझ.
Redchillis entertainment pvt ltd (शाहरुख खान production office)
मी गेटवर पोहोचतो माझ्या गाडीतून, गाडी गेटच्या बाहेर पार्किंगसाठी जागा शोधतोय तेव्हढ्यात कॉलl येतो “hi sir where r u? We r waiting for u.” मी त्यांना सांगतो की, मी आलोय खाली आहे, पार्किंगसाठी जागा शोधतोय. तर, तो मला म्हणतो, अरे sir plz park inside wait m sending someone to assist u आणि काही मिनटांत ऑफिसचं गेट उघडलं जातं, सिक्युरिटी धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो “सर प्लीज आईये.” बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स्स्स....... ते शब्द कानावर पडतात आणि मला 1998चा संतोष दिसतो, बाजूलाच उभा असतो. तो कडक थाप मरतो पाठीवर माझ्या आणि म्हणतो "भाई य्ये मेरा शेर..... ज्जा जिले अपनी जिंदगी."
शाहरुख काकांच्या सिनेमांतलं त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य. "कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की, कोशिश में लग जाती है." आणि आपल्या मराठीत म्हण आहेच की देवाची करणी आणि नारळात पाणी! बस बाप्पाकडे एवढीच मागणी, तू खूप देतोयस पण, ते सांभाळण्याची बुद्धी आणि शक्ती सुद्धा दे महाराजा! बाकी मला अजून मोठ्ठं करायला तुम्ही सगळे आहातच, आवडलं तर शाब्बास म्हना आणि नाही आवडलं तर कान पिळा, पन हानू नका!’
हेही वाचा :
PHOTO : ‘मॉम टू बी’, आलिया भट्टने पहिल्यांदाच फ्लाँट केला बेबी बंप! पाहा फोटो...
Brahmastra : अयान मुखर्जीनं सांगितला 'ब्रह्मास्त्र'चा दहा वर्षांचा प्रवास; शेअर केला खास व्हिडीओ