एक्स्प्लोर

Ruchita Jamdar On Vishal kotian: 'मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय...'; बिग बॉसच्या घरात विशालसोबत रुचिताचं नाव जोडलं, ढसाढसा रडलेले वडील

Ruchita Jamdar On Vishal Kotian: घरातील प्रत्येकासोबत रुचिताचं कशाना कशावरुन तरी भांडण झालेलं. प्रत्येक आठवड्यात रुचितानं जबरदस्त खेळी दाखवून, आपलं नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचवलेलं. 

Ruchita Jamdar On Vishal kotian: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात गेल्या आठवड्यात सर्वात धक्कादायक एलिमिनेशन झालं. फायनलपर्यंत नक्की जाणार, असं वाटणारी स्पर्धक कोल्हापूरची रुचिता जामदार (Ruchita Jamdar) घराबाहेर पडली. रुचितानं अगदी पहिल्या दिवसांपासूनच घर दणाणून सोडलेलं. घरातील प्रत्येकासोबत रुचिताचं कशाना कशावरुन तरी भांडण झालेलं. प्रत्येक आठवड्यात रुचितानं जबरदस्त खेळी दाखवून, आपलं नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचवलेलं. 

टोळीमधले सदस्य सोडले, तर तिचं कुणासोबतच पटलं नाही. पण, त्या टोळीतल्या लोकांसोबतही वेळोवेळी रुचिताचे खटके उडाल्याचंही पाहायला मिळालं. शिवराळ भाषा, सातत्यानं समोरचा अपमान करणं आणि कर्कश्य आवाजात भांडणं यामुळे रुचिता जामदार घरातल्यांसोबतच प्रेक्षकांसाठीही डोकेदुखी झालेली. काहींनी तर तिला बिग बॉस मधून काढून टाका, अशा कमेंट्स करुन तिच्याविरोधात ट्रेंड सुरू केला होता. कित्येकदा भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुखनं तिची शाळा घेतली होती. पण, तिच्यावर कसलाच परिणाम झाला नाही. पुढे सतत भांडणारी रुचिता सतत विशाल कोटियानसोबत दिसायला लागली आणि बिग बॉसच्या घरात लव्ह अँगल आला. घरातल्यांनी तिला वेळोवेळी समजावलं पण रुचितानं ऐकलं नाही आणि अखेर रुचिता घरातून एलिमिनेट झाली. पण, विशालसोबत जोडलेल्या नावाचा मनस्ताप रुचिताच्या कुटुंबीयांनाही सहन करावा लागला. याबाबत स्वतः रुचितानं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KalaKatta (@kalakattaofficial)

'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारनं एका मुलाखतीत बोलताना विशाल सोबत नाव जोडलं गेल्यामुळे तिच्या कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला, याबाबत सांगितलं. लोकांचे टोमणे ऐकून तिचे वडील अक्षरशः रडलेले, असंही रुचितानं सांगितलं. 

रुचिता जामदार नेमकं काय म्हणाली?

रुचिता जामदार हिनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "सगळं घर माझ्या विरोधात असताना फक्त विशाल माझ्या बाजूने उभा होता त्यामुळे आमची मैत्री घट्ट झालेली... मात्र आमच्यात प्रेम किंवा काही चुकीचं असं कधीच नव्हतं. मात्र, या चर्चेचा सर्वात मोठा त्रास झाला, तो माझ्या कुटुंबाला... लोक माझ्या पप्पांना येऊन म्हणायचे, तुमची मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय... हे ऐकून माझ्या पप्पांच्या पायाखालची जमीन सरकली. माझे पप्पा कधीच रडले नव्हते पण त्या दिवशी खूप रडले... जर मी चुकीची असेल, तर मला बोला पण माझ्या घरच्यांना का त्रास देता? टीव्हीवर जे दिसतं, ते नेहमीच शंभर टक्के खरं नसतं..."

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन ऐन रंगात आला आहे. घरात वाईल्ड कार्ड सदस्यांनी आधीपासूनच घरात असलेल्या स्पर्धकांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यात बिग बॉसचे ट्वीस्ट सदस्यांना खूपच भारी पडत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Chota Pudhari Ghanshyam Darode Movie: 'बिग बॉस' फेम छोटा पुढारीला सिनेमा मिळाला, 'पिक्चर बॉईज' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget