Chota Pudhari Ghanshyam Darode Movie: 'बिग बॉस' फेम छोटा पुढारीला सिनेमा मिळाला, 'पिक्चर बॉईज' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार
Chota Pudhari Ghanshyam Darode Movie: चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता 'पिक्चर बॉईज' (Picture Boys) या चित्रपटातून पाहता येणार आहे.

Chota Pudhari Ghanshyam Darode Movie: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन सध्या धुमाकूळ घालतोय. पण, तरीसुद्धा 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची आणि त्यात झळकलेल्या स्पर्धकांची क्रेझ काही कमी झालेली नाही. बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये छोटा पुढारी म्हणजेच, घनश्याम दरवडे (Ghanshyam Darwade) स्पर्धक म्हणून सहभागी झालेला. पाचव्या सीझनमध्ये छोटा पुढारीची चांगलीच चर्चा रंगलेली. अशातच आता 'बिग बॉस मराठी'चं घर गाजवणारा छोटा पुढारी रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी मराठी सिनेमात घनश्याम दरवडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता 'पिक्चर बॉईज' (Picture Boys) या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार आहे. चित्रपटाचं दमदार पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.
त्रिमूर्ती फिल्म्सनं 'पिक्चर बॉईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
View this post on Instagram
चित्रपटातूनच चित्रपटाची गोष्ट सांगण्याचा प्रकार या पूर्वी अनेकदा हाताळला गेला आहे. मात्र, चित्रपटात हिरो बनण्याची धडपड असलेल्या तरुणांची गोष्ट विनोदी, मनोरंजक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न "पिक्चर बॉईज" या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) आणि इतरही नव्या जुन्या कलाकांची फळी चित्रपटात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा "पिक्चर बॉईज" हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणं पर्वणीच ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दिग्गज सिनेअभिनेत्रीचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; नव्या मालिकेची रंगलीय चर्चा!





















