Delhi Crime season 2 : समाजातील गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी वर्तिका-निती सज्ज! ‘दिल्ली क्राईम सीझन 2’ प्रेक्षकांच्या भेटीला
Delhi Crime season 2 : ‘दिल्ली क्राईम सीझन 2’ (Delhi Crime season 2) ही बहुचर्चित वेब सीरिज आज (26 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Delhi Crime season 2 : ‘दिल्ली क्राईम सीझन 2’ (Delhi Crime season 2) ही बहुचर्चित वेब सीरिज आज (26 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 2019मध्ये आलेली नेटफ्लिक्सची सीरिज 'दिल्ली क्राईम' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तेव्हापासून प्रेक्षक सीरिजच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) डीसीपी वर्तिकाच्या भूमिकेत दिल्लीत घडणाऱ्या गुन्ह्यांवर कारवाई करताना दिसणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीने दुसऱ्या सीझनबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
अभिनेत्री शेफाली शाह (Shefali shah) तिच्या ‘डीसीपी वर्तिका चतुर्वेदी’ या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाली की, ‘सीरिज यासाठी पसंत केली जात आहे कारण ती खरी वाटते. त्यातले पोलिस बनावट वाटत नाहीत. सुपर कॉप ऐवजी ते देखील सामान्य माणसं वाटतात. सामर्थ्य आणि शक्ती, तसेच कमकुवतपणा हा त्यांच्या पात्राचा एक भाग आहे. शो सामाजिक विषयावर भाष्य करत नाही, तर समाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि हे सर्व लोक त्या समाजाचा भाग आहेत.’
या नव्या सीझनबद्दल बोलताना शेफाली म्हणाली की, ‘सीझन 2 पहिल्या सीझनपेक्षा खूपच वेगळा आहे. येथे गुन्हा, गुन्हेगार आणि पुरावे नसून आत्मनिरीक्षण आहे, जे खूपच आश्चर्यकारक आहे. पहिल्या सीझनमध्ये कथा अगदी स्पष्ट होती. पण, यावेळी ते तितकं सोपं नाहीये.’
खाकी परिधान केल्यावर जग बदलतं!
‘दिल्ली क्राईम सीझन 2’च्या (Delhi Crime season 2) निमित्ताने पुन्हा एकदा खाकी परिधान करताना रोमांचित झाल्याचे शेफालीने सांगितले. ती म्हणाली, ‘त्या वर्दीमुळे तुमच्यात काहीतरी बदल होतो. वर्दी परिधान केल्याने काहीतरी वेगळेच घडते. जेव्हा आम्ही दिल्ली क्राईम सीझन 2 करणार होतो, तेव्हा माझ्या मनात पहिली गोष्ट हीच होती की, पहिला भाग तर झाला, पण मी हेच करू शकेन का? पण, जेव्हा मी पुन्हा त्या पात्रासाठी तयार झाले, तेव्हा खूप वेगळं वाटत होतं. ती वर्दी परिधान केल्यावरच्या भावना शब्दांत मांडता येत नाहीत.’
‘मिर्झापूर’ फेम रसिका दुग्गलही दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!
‘दिल्ली क्राईम’च्या सीझन 2मध्ये (Delhi Crime season 2) शेफाली शाहसोबत राजेश तेलंग (Rajesh Telang) आणि रसिका दुग्गल (Rasika Duggal) देखील दिसणार आहेत. अभिनेत्री रसिका दुग्गल डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अवतारात दिसत आहे. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये ती कमी शिकलेली, पण महत्त्वाकांक्षी महिला म्हणून दिसली. तर, ‘दिल्ली क्राईम’मध्ये, ती समाजातून गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याचे आव्हान स्वीकारताना दिसली. ‘दिल्ली क्राईम’च्या दुसऱ्या सीझनमध्ये रसिका साकारत असलेली निती खन्ना आता आयपीएस ट्रेनीमधून प्रमोशन मिळाल्यानंतर एसीपी बनली आहे.
हेही वाचा :