एक्स्प्लोर

De Dhakka 2 Teaser Out : काळ्या-पिवळ्या टमटमऐवजी आता कार दिसणार!, ‘दे धक्का 2’चा भन्नाट टीझर पाहिलात का?

De Dhakka 2 :   ‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय...’, म्हणत हा धमाल टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

De Dhakka 2 : अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), शिवाजी साटम (Shivaji Satam), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांच्या बहारदार विनोदाने सजलेल्या ‘दे धक्का’ (De Dhakka) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत स्थान आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, कोरोनामुळे चित्रपटात खंड पडला होता. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘दे धक्का 2’ (De dhakka 2) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय...’, म्हणत हा धमाल टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा सगळ्या जुन्या पात्रांची झलक दिसत आहे. पण, यावेळी काळ्या-पिवळ्या टमटमऐवजी कार दिसणार आहे. आता ही गाडी प्रेक्षकांना किती हसवणार हे लवकरच कळणार आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

पाहा टीझर :

View this post on Instagram
 
A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

पुन्हा एकदा दिसणार कलाकारांची धमाल!

‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव,  धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.

‘दे धक्का’ हा चित्रपट 2008साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते.

यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!

यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.

हेही वाचा :

Hemangi Kavi : 'वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा...'; हेमांगीची पोस्ट पुन्हा चर्चेत

Vikram, Kamal Haasan : ‘आता सगळी कर्ज फेडू शकतो, कुणाला काहीही देऊ शकतो!’, 300 कोटींच्या ‘विक्रम’नंतर कमल हासन यांची प्रतिक्रिया!

Bharti Singh : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहच्या लेकाला पाहिलं का? हर्ष लिंबाचियाने शेअर केला खास फॅमिली फोटो!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget