Vikram, Kamal Haasan : ‘आता सगळी कर्ज फेडू शकतो, कुणाला काहीही देऊ शकतो!’, 300 कोटींच्या ‘विक्रम’नंतर कमल हासन यांची प्रतिक्रिया!
Vikram : अभिनेते-निर्माते कमल हासन (Kamal Haasan) यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम’ (Vikram) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.
Vikram : अभिनेते-निर्माते कमल हासन (Kamal Haasan) यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम’ (Vikram) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही, तर सर्वच भाषेत ‘विक्रम’ केला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अलीकडेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे कमल हासन खूपच खूश असून, आता त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, माझा चित्रपट इतके पैसे कमवेल, असे कुणालाच वाटत नव्हते.
‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता.
चित्रपटाच्या यशावर काय म्हणाले कमल हासन?
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कमल हासन यांनी या चित्रपटाच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'जर आपल्याला प्रगती करायची असेल, तर आपल्याकडे असा लीडर असला पाहिजे, जो पैशाची चिंता करत नाही. मी 300 कोटी कमवू शकतो, असे म्हणायचो तेव्हा त्यांना वाटायचे की, मी काहीही बात मारतोय. पण आता विक्रमने 300 कोटी कमावल्याचे सर्वच लोक पाहत आहेत.’
कमल हासन पुढे म्हणाले की, 'आता मी माझे सगळे कर्ज फेडणार आहे. त्यानंतर आता कुटुंबासाठी जे काही करता येईल ते करेन. त्यानंतर माझ्याकडे काहीच उरणार नाही. मात्र, मी म्हणू शकेन की, आता मला दुसऱ्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत. मला आता दुसऱ्याच्या पैशाने कोणाचीही मदत करायची नाही. मला फक्त एक चांगला माणूस व्हायचे आहे.'
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई!
रिपोर्ट्सनुसार, 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भारतीय भाषांमध्ये 220.75 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 322.15 कोटी रुपयांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.
हेही वाचा :
Vikram : पुष्पा नंतर आता विक्रमची क्रेझ; क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर
Vikram box office day 10 collection : जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रम'ची जादू
Vikram : विक्रमच्या यशानंतर सूर्याला कमल हसन यांनी दिलं 'रोलेक्स' घड्याळ; किंमत ऐकून व्हाल थक्क!