Munawar Faruqui : ‘माझ्या मुलासाठी हा शो करतोय!’, ‘लॉक अप’मध्ये मुनव्वर फारुकीने उघड केलं मोठं रहस्य!
Lock Upp Show : कॉमेडीयन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ शोमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. कॉमेडीयनची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Munawar Faruqui : मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा ‘लॉक अप’मधील (Lock Upp) सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहे. मुनव्वर जेव्हापासून कंगना रनौतचा (Kangana Ranaut) कैदी बनला आहे, तेव्हापासून त्याची महिला फॅन फॉलोइंग वाढत आहे. सायेशा शिंदे आणि अंजली अरोरा यांचेही मन मुनव्वर भाळले आहे. पण या कॉमेडीयनने आता शोमध्ये असे एक गुपित उघड केले आहे, ज्यामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
वास्तविक, सोशल मीडियावर मुनव्वर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरीच चर्चा रंगली आहे. न्यायाच्या दिवशी कंगना रनौतने मुनव्वरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले. कंगनाने मुनव्वरला सांगितले की, ‘तुला मला काही सांगायचे असेल, तर सांगू शकतोस.’ सुरुवातीला मुनव्वरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यास नकार दिला, पण कंगनाच्या समजवण्यानंतर त्याने मौन सोडले आणि आपल्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला.
मुनव्वर याने सांगितले की, त्याचे लहान वयातच लग्न झाले होते. मुनव्वर म्हणाला की, गेल्या दीड वर्षांपासून तो आणि त्याची पत्नी एकमेकांसोबत राहत नाहीत. मुनव्वर याने आपल्या लग्नाचे प्रकरण कोर्टात सुरू असल्याने त्याबाबत जाहीरपणे बोलणे टाळत असल्याचा धक्कादायक खुलासा केला.
मुनव्वरचे गुपित कळल्यावर अंजलीचे हृदय तुटले?
मुनव्वर याची ही गुपितं ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. नुकतेच मुनव्वर याच्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या अंजलीला कॉमेडीयनच्या लग्नाची बातमी ऐकून धक्काच बसला आहे.
एका मुलाचा वडील आहे मुनव्वर!
कंगना रनौतनंतर मुनव्वरने आपल्या आयुष्यातील आणखी एक मोठं गुपित बाकीच्या कैद्यांसमोर उघड केलं. मुनव्वर याने सांगितले की, तो हा शो आपल्या मुलासाठी करत आहे. म्हणजेच मुनव्वर याचं लग्न तर झालं आहेच, पण त्याला मुलगाही आहे.
सायेशा शिंदेशी संवाद साधताना मुनव्वर याने सांगितले की, आपल्या मुलामुळेच लग्नाबाबत जाहीरपणे बोलायचे नव्हते. मुनव्वर म्हणाला की, गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या आयुष्यात असे बरेच काही घडले आहे, जे त्याला सतत त्रास देत आहे आणि त्याच्या समस्या आणखी वाढू नयेत, अशी त्याची इच्छा आहे. मुनव्वर म्हणाला की, मला माझ्या मुलाला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करायची इच्छा नाही. आता मुनव्वरच्या या मोठ्या खुलाशाचा त्याच्या खेळावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
- Yashoda : समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'ची रिलीज डेट जाहीर, सिनेमात अॅक्शनचा तडका
- Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट
- Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
