(Source: ECI | ABP NEWS)
इंद्रायणीच्या संघर्षाला मिळणार पिंगा गर्ल्सची साथ! अपहरणाचा थरार, इंदू आणि अधूला संपवण्याचा श्रीकलाचा डाव होईल का यशस्वी?
6 ते 11 ऑक्टोबर या आठवड्यात संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रसारित होणाऱ्या या विशेष भागांमध्ये पहायला मिळणार आहे.

Mumbai: कलर्स मराठी नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं, भव्य आणि भावनिक अनुभव देत असते. आता प्रेक्षकांसमोर येत आहे असाच एक अनोखा सप्ताह ‘महासंगमचा महाआठवडा’! दोन लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिका एका धाग्यात गुंफल्या जाणार. 6 ते 11 ऑक्टोबर या आठवड्यात संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रसारित होणाऱ्या या विशेष भागांमध्ये पहायला मिळणार आहे. (Marathi Serial)
Mahasangam Week: इंदू, वल्लरी आणि पिंगा गर्ल्स, अपहरणाचा थरार
या विशेष भागांमध्ये इंदू आणि अधू मुंबईत एका नव्या प्रवासासाठी दाखल होतात. इंदूचं शाळा सुरू करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी वल्लरी तिची साथ देणार आहे. त्याचवेळी ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत प्रेरणाच्या आयुष्यात मोठं संकट येतं अण्णा केदार प्रेरणाचं अपहरण करतो, आणि पिंगा गर्ल्स पूर्णपणे हादरून जातात. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना इंदूच्या श्रद्धेची आणि तिच्या सकारात्मक ऊर्जेची मदत मिळते. इंदू, वल्लरी आणि पिंगा गर्ल्स एकत्र येऊन प्रेरणाचा शोध घेतात आणि अण्णा केदारचा कट हाणून पाडतात. या सर्व घटनांमध्ये प्रेम, मैत्री आणि विश्वासाची खरी ताकद अनुभवायला मिळणार आहे.
दिवस रात्र शुटींग, प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
या विशेष आठवड्यासाठी सलग आठ दिवस दिवस-रात्र शूटिंग करण्यात आलं. मोठ्या ॲक्शन सिक्वेन्सेस, थरारक पाठलाग, रस्त्यांवरील नाट्यमय सीन आणि भावनिक क्षणांचं चित्रण काटेकोर नियोजनानं पार पाडण्यात आलं. अनेक लोकेशन्सवर एकाच वेळी शूट सुरू होतं, त्यामुळे सेटवर सतत गजबजलेलं वातावरण होतं. या शूटदरम्यान पाचही नायिका इंदू, वल्लरी, प्रेरणा, तेजा आणि श्वेता एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांची केमिस्ट्री, एकत्र काम आणि action mode मधला उत्साह प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे.
वल्लरीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या शेटे सांगते, “या महासंगमसाठी आम्ही खूप तयारी केली. पहिल्यांदाच हार्नेस लावून हवेत उडत fight sequences केले. मला उंचीची भीती आहे, पण तरीही हा अनुभव अफलातून ठरला. शूटदरम्यान खूप मजा, भावनिक क्षण आणि एकत्रित कामाचं समाधान मिळालं. इंदू आणि अधूसोबत पुन्हा काम करण्याचा आनंदही वेगळाच आहे. प्रेक्षकांनी हा महाआठवडा नक्की पाहावा.”
View this post on Instagram
विशेष कीर्तन प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार
तर इंद्रायणीची भूमिका करणारी कांची शिंदे म्हणाली, “या महासप्ताहात इंद्रायणी, अधू आणि श्रीकला मुंबईत दाखल झाले आहेत. इंदूचं गावातील मुलांसाठी शाळा उभारण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वल्लरी तिची मदत करते. या भागात एक विशेष कीर्तन आहे जे प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल. या कीर्तनात श्रद्धा, प्रेरणा आणि लढाऊ वृत्ती दिसणार आहे. दिग्दर्शक आणि टीमच्या पाठिंब्यामुळे आम्ही ते उत्कृष्टरीत्या सादर करू शकलो. प्रेरणाला वाचवताना आम्ही सर्वजणी action scenes मध्ये सहभागी झालो, आणि तो अनुभव आयुष्यभर लक्षात राहील.” तर मग, नक्की पाहा ‘महासंगमचा महाआठवडा’, 6 ते 11 ऑक्टोबर दरम्यान दररोज संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर, आणि अनुभवा इंद्रायणी, वल्लरी आणि पिंगा गर्ल्सच्या मैत्रीची ताकद!
























