Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'मायबाप प्रेक्षकांना विनम्र आवाहन'
नुकतीच चिन्मयनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यानं प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.
Chinmay Mandlekar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामधील चिन्मयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच त्याचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट देखील सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. नुकतीच चिन्मयनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यानं प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.
चिन्मयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो. 'शेर शिवराज या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरी, सोशल मीडियावरील पोस्टवरून आमच्यापर्यंत तुमचं प्रेम पोहचत आहे. सर्वांना मी नम्र विनंती करतो की, चित्रपटाचा शेवट आपल्या मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर शेअर करू नका. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांना चित्रपटातील थरार चित्रपटगृहामध्ये तुम्ही जसा अनुभवलात तसाच अनुभवू द्यात.' चिन्मयनं या व्हिडीओला 'मायबाप प्रेक्षकांना विनम्र आवाहन' असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
शेर शिवराज हा चित्रपट 22 एप्रिल रोजी रिलीज झाला. या चित्रपटामध्ये मुकेश ऋषी, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर,समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, वैभव मांगले या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :