एक्स्प्लोर

फक्त 1 तास 34 मिनिटांचा थरार! 'हा ' हॉरर चित्रपट पाहिल्यावर जंगलाजवळूनही जाण्याची भीती वाटेल

अवघ्या 1 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट भीती, सस्पेन्स आणि दमदार कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Horror Movie: आपण अनेकदा असे चित्रपट पाहतो जे आपल्या मनावर खोलवर ठसा उमटवतात. दिवस लोडतात महिने लोटून जातात पण या कथा आपल्या मनावर कोरलेल्या राहतात.2020 मध्ये प्रदर्शित झालेला असाच एक हॉरर चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. या चित्रपटातली अनेक दृश्य भीतीदायक तर आहेतच पण यातली भयाण दृश्य, आणि रहस्यमय वातावरण भल्याभल्यांना क्षणभरही जागेवरून उठू देणार नाही असा आहे. (OTT Horror THriller)

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या एक असा हॉरर-सस्पेन्स चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे, ज्याने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले आहे. 2020 साली प्रदर्शित झालेला ‘बुलबुल’ हा चित्रपट सध्या पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत आहे. अवघ्या 1 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट भीती, सस्पेन्स आणि दमदार कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

19व्या शतकातील बंगालमधील कथा

‘बुलबुल’ या पीरियड हॉरर ड्रामा चित्रपटाची कथा 19व्या शतकातील बंगाल प्रेसीडेंसीतील एका गावाभोवती फिरते. लहान वयातील एका मुलीचं लग्न तिच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या श्रीमंत जमीनदार इंद्रनीलसोबत लावलं जातं. त्या मुलीची मैत्री इंद्रनीलचा लहान भाऊ सत्यासोबत होते. सत्या तिला लहानपणी भूत-प्रेतांच्या आणि चेटकिणींच्या गोष्टी सांगत असतो. काळ पुढे सरकतो आणि 20 वर्षांनंतर दोघे मोठे होतात. मात्र, इंद्रनीलला आपल्या पत्नी बुलबुल आणि सत्या यांच्यातील जवळीक खटकू लागते. त्यानंतर तो सत्या याला शिक्षणासाठी लंडनला पाठवून देतो.

इथून सुरू होतो खरा थरार...

सत्या लंडनला गेल्यानंतर इंद्रनील आपल्या पत्नीवर अत्यंत अमानुष अत्याचार करतो. मारहाणीत तिच्या पायांच्या हाडांचा चुराडा होतो. त्यानंतर इंद्रनीलचा मानसिकदृष्ट्या अस्थिर जुळा भाऊ महेंद्र बुलबुलवर अत्याचार करतो. या क्रूरतेमुळे तिचा मृत्यू होतो आणि पुढे ती एक भयावह चेटकीण बनते. यानंतर ही चेटकीण एक-एक करून त्या सर्व लोकांना संपवू लागते, ज्यांनी महिलांवर किंवा लहान मुलींवर अत्याचार केलेले असतात. पुढे या कथेतला थरार आणि सस्पेन्स हळूहळू उलगडत जातो.

नेटफ्लिक्सवर उपलब्ध

हॉरर, सस्पेन्स आणि समाजाला विचार करायला लावणारा संदेश देणारा ‘बुलबुल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने बुलबुलची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अविनाश तिवारी, पाओली दाम, राहुल बोस आणि परमब्रत चट्टोपाध्याय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

विशेष म्हणजे या चित्रपटाला IMDb वर 6.6 रेटिंग मिळाले असून सध्या तो पुन्हा एकदा ओटीटीवर ट्रेंड होत आहे. हॉरर आणि सस्पेन्स चित्रपट आवडणाऱ्यांसाठी ‘बुलबुल’ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget