Chhaava Movie Controversy: विक्की कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा इशारा; म्हणाले...
विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मराठा राजा छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान दुखावला जाऊ नये म्हणून हा चित्रपट आधी तज्ज्ञांना दाखवावा, अशी विनंती महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
Vicky Kaushal Chhaava Movie Controversy: विकी कौशल (Vicky Kaushal), अक्षय खन्ना (Akshay Khanna) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. फक्त काही वेळातच हा ट्रेलर चर्चेचा विषय ठरला. सर्वांनी चित्रपटातील स्टार कास्टच्या लूकचं भरभरून कौतुक केलं. या चित्रपटात विक्की कौशल छत्रपची संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्की कौशलचा लूक सर्वांना भावला, तर चित्रपटातील औरंगजेबानं तर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण, त्यानंतर काही वेळातच चित्रपट कॉन्ट्रोवर्सीत अडकला. सध्या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक्सपर्ट्सना दाखवण्यात यावा, अश विनंती केली आहे. एक्सपर्ट्सनी पाहिल्यानंतर तो चित्रपट प्रदर्शित करावा, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा एक ऐतिहासिक ड्रामा आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मुघलांमध्ये ज्यांना मराठा योद्धा म्हणून ओळखलं जायचं, असे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर प्रकाश टाकतो. उदय सामंत यांनी या चित्रपटाच्या कॉन्ट्रोवर्सीबाबत एक ट्वीट केलं आहे. एक्स अकाऊंटवर छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी मोठ्या पडद्यावर आणण्याच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं आहे. पण, मराठा राजाबद्दल आदर राखण्यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे, यावरही भर देण्यात आला.
धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि…
— Uday Samant (@samant_uday) January 25, 2025
'छावा'च्या रिलीज डेटवर महाराष्ट्र सरकारचे मंत्री
उदय सामंत यांनी 'छावा' चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांना जबाबदारीनं काम करण्यास सांगितलं आहे. जर चित्रपटात अजूनही काही आक्षेपार्ह मजकूर राहिला तर चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं जाऊ शकतं, असा इशाराही देण्यात आला आहे. उदय सामंत यांनी लिहिलं की, धर्म आणि स्वातंत्र्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनतोय, ही आनंदाची बाब आहे. जगात त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. दरम्यान, अनेकांनी म्हटलं आहे की, त्यात आक्षेपार्ह दृश्य आहेत. आम्हाला असं वाटतं की, हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो तज्ज्ञांना किंवा जाणकारांना दाखवावा. महाराजांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही.
विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना 'छावा'मध्ये तगडी स्टारकास्ट
मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, 'छावा' हा एक पीरियड ड्रामा आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांची पौराणिक कथा दर्शवितो, ज्याची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे. या चित्रपटात 1681 मध्ये झालेल्या राज्याभिषेकापासून सुरू झालेल्या धाडसी मराठा शासकाच्या गौरवशाली कारकिर्दीचे चित्रण केलं जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :