एक्स्प्लोर

महाशिवरात्रीला 'छावा'वर भोलेनाथाची कृपा; तेराव्या दिवशी सर्वाधिक कमाईचा रचला रेकॉर्ड, 'पुष्पा 2'लाही धूळ चारली

Chhaava Box Office Collection Day 13: मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली दिनेश व्हिजन निर्मित आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Chhaava Box Office Collection Day 13: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा ऐतिहासिक चित्रपट पहिल्या दिवसापासूनच भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत आहे. कमाईच्या बाबतीत 'छावा'नं विक्रम रचले आहेत. विक्की कौशलचा हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं 'छावा'च्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 'छावा'नं दिग्गजांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. चित्रपटानं रिलीजच्या तेराव्या दिवशी किती कोटींची कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात... 

'छावा' नं तेराव्या दिवशी किती पैसे कमावले?

मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली दिनेश व्हिजन निर्मित आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. या ऐतिहासिक रिलीजला दमदार ओपनिंग मिळाली आणि तेव्हापासून 'छावा' बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमवत आहे. यासह, चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

  • 'छावा'ने 31 कोटी रुपयांची कमाई केली.
  • यानंतर, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले.
  • आठव्या दिवशी 'छावा'ने 23.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
  • या चित्रपटानं नवव्या दिवशी 44 कोटी रुपये कमावले.
  • दहाव्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 40 कोटी रुपये होते.
  • अकराव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या सोमवारी चित्रपटाने 18.5 कोटी रुपये कमावले.
  • बाराव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या मंगळवारी 'छावा'नं 18.5 कोटी रुपये कमावले.
  • आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तेराव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या बुधवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
  • सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या तेराव्या दिवशी 21.75 कोटी रुपये कमावले आहेत.
  • यासह, 'छावा'ची तेरा दिवसांत एकूण कमाई आता 385  कोटी रुपये झाली आहे.
 
View this post on Instagram
 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

'छावा'नं तेराव्या दिवशी दिग्गजांचे रेकॉर्ड मोडले

'छावा' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं तेराव्या दिवशी इतर सर्व चित्रपटांच्या कलेक्शनला मागे टाकलं आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा'नं तेराव्या दिवशी दिग्गज चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

  • 'छावा'नं तेराव्या दिवशी 21.75 कोटींची कमाई केली आहे.
  • 'पुष्पा 2'नं तेराव्या दिवशी 18.5 कोटींची कमाई केली आहे.
  • 'बाहुबली 2' नं तेराव्या दिवशी 17.25 कोटी रुपये कमावले होते.
  • 'जवान'नं तेराव्या दिवशी 12.9 कोटी रुपये कमावलेत.
  • 'स्त्री 2'नं तेराव्या दिवशी 11.75 कोटी रुपये कमावलेत.
  • 'धूम 3' नं 13 व्या दिवशी 10.38 कोटी रुपये कमावले.
  • 'गदर 2' नं तेराव्या दिवशी 10 कोटी रुपये कमावले.
  • तेराव्या व्या दिवशी अ‍ॅनिमलनं 9.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

'छावा' 400 कोटींच्या क्लबपासून काही पावलं दूर 

'छावा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटानं रिलीजच्या तेरा दिवसांत 385 कोटी रुपये कमावले आहेत. आणि आता ते 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यापासून फक्त एक इंच दूर आहे. गुरुवारी हा चित्रपट 400 कोटींचा चित्रपट बनेल अशी अपेक्षा आहे आणि यासोबतच 'छावा' हा 2025 मधील हा पराक्रम करणारा पहिला चित्रपट ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 13: 'छावा'च्या डरकाळीनं सारेच हादरले; तेराव्या दिवशी 'स्त्री 2', 'पुष्पा 2' अन् 'जवान'ला पछाडलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget