Chhaava Box Office Collection: 'छावा' जोमात, दिग्गज कोमात, 66 दिवसांत 600 कोटी पार; OTT रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई
Chhaava Box Office Collection: 'छावा'नं 66 दिवसांत 600 कोटींचा आकडा पार केला. 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर, 11 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यानंतरही बॉक्स ऑफिसवर त्याचा यशस्वी प्रवास सुरूच आहे.

Chhaava Box Office Collection: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) या ऐतिहासिक चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) इतिहास रचला आहे. साधारणतः एखादा चित्रपट ओटीटीवर रिलीज (OTT Release) झाला की, त्याचं बॉक्स ऑफिसवरचं बस्तान गुंडाळतो, असंच पाहायला मिळतं. पण, 'छावा'च्या बाबतीत मात्र, असं काहीच झाल्याचं दिसत नाही. उलट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही 'छावा'नं बॉक्स ऑफिसवरची धुवांधार कमाई (Chhawa Earns Huge Amount At The Box Office) सुरूच ठेवली आहे.
'छावा' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे, तरीही बॉक्स ऑफिसवरील त्याचा प्रवास अद्याप संपलेला नाही. विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि विनीत कुमार सिंह यांचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला. तेव्हापासून हा चित्रपट खूप वेळा पाहिला गेला आहे. दरम्यान, 'छावा' 11 एप्रिल रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. सध्या हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जात आहे. पण चित्रपटानं 66 दिवसांत तब्बल 600 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
विक्की कौशलच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा आकडा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिसवर हा पराक्रम करणारा हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. याआधी 'पुष्पा 2' आणि 'स्त्री 2' नंही बॉक्स ऑफिसवर हा पराक्रम केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटात मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 66 व्या दिवसापर्यंत, चित्रपटानं एकूण 600.10 कोटींची कमाई केली होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतरही 'छावा'नं आपलं जागतिक आकर्षण कायम ठेवलं आणि इंग्रजी नसलेल्या चित्रपटांच्या श्रेणीत पाचवं स्थान पटकावलं. या चित्रपटात विक्की कौशलसोबत रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि डायना पेंटी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात ए.आर. संगीत रहमान यांचं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















